| TOR News Network | Sharad Pawar Press : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी नेत्यांची एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचा खेळ सुरु झाला आहे. अजित पवारांसोबत गेलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांसोबत असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरेंनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती.यावर बोलताना शरद पवार यांनी एक भाकीत केले आहे. (Incoming will be increase in party)
यानंतर आमच्याकडं आणखी इनकमिंग होईल आणि त्या मागचं कारणंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत त्याप्रमाणं तुमच्या पक्षात इनकमिंग वाढत चाललं आहे. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, हे इनकमिंग आणखी झालेलं दिसेल. एकदा दुसऱ्या बाजूकडून उमेदवारांच्या निवडीचे निर्णय जाहीर झाले की हे इनकमिंगचं प्रमाण जास्त झालेलं दिसेल.(As Candidate declared incoming will increase)
अजित पवारांकडं गेलेले परत येतील
दरम्यान, अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील जागा वाटप पूर्ण झालेलं नाही. काही जागांवर अद्यापही खलबतं सुरुच आहेत. एकदा महायुतीचं संपूर्ण जागा वाटप झालं आणि त्यात इच्छुकांना जर संधी मिळाली नाही तर हे लोक दुसऱ्या पक्षात संधी शोधत येतात. त्यानुसार, अजित पवारांकडं गेलेले अनेक जण आपल्याकडं येतील असा दावाच शरद पवारांनी केला आहे. (Many people who went to Ajit Pawar will come to us)
त्यांना जनतेचा पूर्ण सपोर्ट आहे
या पत्रकार परिषदेत त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर भाष्य केलं असून आपला त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. केजरीवाल हे तीन वेळा मुख्यमंत्री बनले आहेत, त्यांना जनतेचा पूर्ण सपोर्ट आहे. त्यामुळं केजरीवालांवर सुडापोटी ईडीची कारवाई करवनं भाजपला चांगलचं महागात पडणार असल्याचं भाकीतही यावेळी शरद पवार यांनी केलं आहे.