Saturday, January 11, 2025

Latest Posts

सुपारीबाज पक्षावर जास्त बोलण्याची गरज नाही

| TOR News Network |

Aaditya Thackeray Latest news : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या आता वरळी मतदार संघातून वाद पेटला आहे.(Amit Thackeray on worli constituency) गेल्या पाच वर्षात वरळी मतदार संघात काहीच केले नाही. आता तिन महिन्यात काय होणार? अशा शब्दात अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले होते. (aaditya Thackeray Slams Amit thackeray) त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनीही बिनशर्त, पाठिंबावाल्यांनी आता ‘शर्ट’ घालून यावे,सुपारीबाज पक्षावर जास्त बोलण्याची गरज नाही अशा शब्दात अमित यांना डिवचले आहे. मनसेच्या विधानसभा अभियानाची सुरूवात अमित ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून केली होती.(Mns On Worli constituency) त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्याला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

अमित ठाकरे यांच्या टिकेला आदित्य ठाकरे यांनी तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले आहे. (aaditya Thackeray on Amit Thackeray) मनसेने तुम्हाला वरळीत बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे तुम्ही निडून आलात. पण तुम्ही कामे केली नाहीत अशी अमित ठाकरे यांनी टिका केली होती. यावर बोलताना आदित्य यांनी मनसेचा उल्लेख सुपारीबाज पक्ष असा केला. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. निवडणुका आल्या की हे पक्षा उगवतात.( aaditya Thackeray on Mns) मते खाण्याची त्यांची कामे आहेत. अशा शब्दात त्यांनी मनसेचा समाचार घेताल. बिनशर्त पाठिंब्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. मला पराभूत करायचं असेल तर बिनशर्त वाल्यानी शर्ट घालून यावे असे ते म्हणाले. निवडणुका आल्या की ते स्टंटबाजी करतात असा आरोपही आदित्य यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने वरळीत आदित्य ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता.(Mns Support aaditya Thackeray) त्यानंतर आदित्य हे विधानसभेत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.मात्र गेल्या पाच वर्षात त्यांनी या मतदार संघात काहीच केले नाही असा थेट आरोप त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात काही करता आले नाही ते तीन महिन्यात काय करणार असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते मतदार संघात फिरलेही नाहीत. कोळी वाड्याचे प्रश्न आजही तसेच आहे. या साठी बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता असा टोलाही अमित यांनी आदित्य यांना लगावला.

Latest Posts

Don't Miss