| TOR News Network | Chandrahar Patil Latest News : सांगलीच्या उमेदवारीवरुन सध्या महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील नाराज झाले असून ते बंड पुकारण्यास तयार आहे. (Vishal patil sangli Congress)अशात चंद्रहार पाटील यांना माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल, तर मी उमेदवार मागे घेण्यास तयार असल्याचं मोठे वक्तव्य केलं आहे.(I m ready to quit from sangli lok sabha)
फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको, हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावे. मान्य आहे, माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही, असंही ते म्हणाले आहेत. आज सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करता ते असं म्हणाले आहेत. यावेळी जयंत पाटील, शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे-पाटीलही मंचावर उपस्थित होते.
चारवेळा उमेदवारी जाहीर
चंद्रहार पाटील म्हणाले की, ”शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर गेलो असतो उद्धव ठाकरे यांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली. मिरज येथे उद्धव ठाकरे यांची मोठी सभा पार पडली, तिथे दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा झाली. तिसऱ्यांदा पक्षाच्या वतीने अधिकृतपणे पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली. चौथ्यांदा महाविकास आघाडीच्या पत्रकात माझ्या उमेदवारीची घोषणा झाली.”
ते म्हणाले, ”एका उमेदवाराची चारवेळा घोषणा होऊन सुद्धा अजून आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत. नेमकं त्यांचं दुखणं काय आहे, हे अजूनही माझ्या लक्षात आलं नाही. एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय, हे तुमचं दुखणं आहे? की, शिवसेना पक्षाची ताकद येथे कमी आहे, हे तुमचं दुखणं आहे?”(Is shivsena poor in sangli) चंद्रहार पाटील पुढे म्हणाले, ”महाविकस आघाडी ही फक्त सांगलीपुरती नाही. महाविकास आघाडीही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडीही देशात काम करत आहे. त्यामुळे नेमकं यांचं काय दुखणं आहे, हे माझ्या लक्षात आलं नाही.”
विशाल पाटीलांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
दरम्यान, सांगलीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. येथे विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Vishal patil Independent candidature application filed) त्याचसोबत आता विशाल पाटील हे उद्या शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.