| TOR News Network |
Dilip Valse Patil Latest News : सध्या राज्यात कोणाचं सरकार येणार आणि कोण घरी बसणार याची चर्चा जोरदार होत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. (Dilip Walse Patil big Statement) त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. राजकारण हे नेहमी बदलत असते. त्यामुळे निकालनंतर काय होईल यावर सर्व काही अवलंबून आहे असं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर अजित पवारांना साथ देणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये दिलीप वळसे पाटील ही होते. दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदार संघातून आता अजित पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात आहेत.(Dilip wales patil from ambegaon) लोकसभेला ते सक्रीय नव्हते. त्यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे ते प्रचारापासून दुरही होते. त्याचा परिणामही दिसून आला. त्यांच्या मतदार संघातून अमोल कोल्हे यांना मोठी आघाडी मिळाली होती. मात्र यावेळी ते स्वत: निवडणुकीच्या मैदानात आहे. शिवाय पुन्हा एकदा त्यांना विजयाची खात्री आहे.
मात्र परत एकदा शरद पवारांकडे जाणार का या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं आहे. आता शरद पवारांकडे परत जाण्याची वेळी निघून गेली आहे असं ते म्हणाले.(Time gone to return at pawar saheb) पण पुढच्याच क्षणाला त्यांनी राजकारण हे बदलत असतं. आताचं राजकारण न समजण्या सारखं आहे. या विधानसभा निवणुकीचा निकाल काय लागणार? त्यानंतरची स्थिती काय असेल? कोण कोणाची दोस्ती करेल? त्यानंतरच आपली भूमिका ठरेल असं विधान त्यांनी केलं आहे.
दरम्यान सरकारमध्ये जाण्याचा निर्णय हा सामूहीक होता. याची कल्पना शरद पवारांना दिली होती. त्याला सर्वांचा पाठींबा होता. पण काहींनी शरद पवारांकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही निर्णय घेतला होता. त्यामुळे मागे येण्याचा प्रश्न येत नव्हता असेही ते म्हणाले. पवार साहेबांना अजूनही आपण सोडलेले नाही. त्यांच्या विषयी आदर आणि प्रेम अजूनही आहे असंही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय गृहमंत्री असताना शिवसेनेत फूट पडणार आहे याचे इनपूट्स आपल्याकडे होते.(I have the input of Shivsena split at that time) त्याची माहितीही उद्धव ठाकरे दिली होती. पण ठाकरे काही चिंता करू नका असे सांगत होते असंही त्यांनी यावेळी सांगितलं.