Thursday, January 16, 2025

Latest Posts

मी पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे सुप्रिया ताई – दुहान

| TOR News Network |

Sonia Doohan Latest News : मी पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे सुप्रिया ताई. (I left NCP Only deu to Supriya sule) केवळ सोशल मीडियावर सेल्फी आणि फोटो टाकून पक्ष चालत नाही. सुप्रिया ताई आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना हे समजून घ्यावे लागेल. (Sonia Doohan on Supriya tai) नेते नसलेल्या लोकांना घेऊन पक्ष चालणार नाही. सुप्रिया ताईंमुळे मी पक्ष सोडत आहे, हे मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे. सुप्रिया ताईंमुळे धीरज शर्मा यांनी पक्ष सोडला. सुप्रिया ताईंमुळेच आम्ही दोघांनी पक्ष सोडला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेडी जेम्स बाँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी  केला. (NCP SP Group Lady James Bond Sonia Doohan)

 सोनिया दुहान यांनी गेल्यावेळीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकला. (Sonia Doohan Left Sharad Pawar NCP) खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला.(Sonia Doohan Blame Supriya sule) त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. (Sonia Doohan To Join Congress)

राष्ट्रवादी-एससीपी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी पक्षाचा राजीनामा दिला.यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोपही केले होते. (Doohan Serious charges on supriya sule) “आपण शरद पवार आणि पक्षाला सोडलेलं नाही. पण पक्षात सर्व काही आलबेल नाही. आपण  सुप्रिया सुळे यांच्यामुळे आपल्याला सोडावा लागत आहे, (Sonia Doohan on supriya sule) असा आरोप सोनिया दुहान यांनी केला होता.

मी पक्ष सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे सुप्रिया ताई. सर पक्ष सांभाळत असताना सगळं नीट चाललं होतं. पण आता काय होत आहे? हा निर्णय मी आनंदाने घेतलेला नाही. (Sonia Doohan on NCP)यानंतर काय करायचे हे मी ठरवलेले नाही,असेही त्यांनी म्हटले होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया दुहान यांची राष्ट्रवादीच्या समस्यांवरील संकट मोचन म्हणून ओळख होती.  2019 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यात सोनिया दुहान यांनी महत्त्वाची भूमिका बजवली होती. (Sonia Doohan Role in NCP)  2019 मध्ये, सोनिया दुहान यांनी हरियाणातील गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना वाचवून अजित पवार गटासह सरकार स्थापन करून दिले नाही.

सोनिया दुहान यांनी गुरुग्राममधील हॉटेलमधून भाजपच्या 150 कार्यकर्त्यांना चकवा  देऊन राष्ट्रवादीच्या चार आमदारांची सुटका केली होती. यात नरहरी झिरवाळ, दौलत दरोडा, अनिल पाटील आणि नितीन पवार यांचा समावेश होता. अजित पवार यांनी शपथ घेतल्यावर जे आमदारगायब होते. अशा आमदारांना शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात सोनिया दुहान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Latest Posts

Don't Miss