Sunday, November 17, 2024

Latest Posts

भाजपात असलेले राष्ट्रवादीचे जुने मोहरे घरवापसी करणार

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : आगामी विधानसभा निवडणुक बघता अनेक नेते भविष्याचा अंदाज घेत पक्ष बदलत आहे.सध्या सर्व राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. (Leaders in Action For Vidhan Sabha ) विशेष म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातून राष्च्रवादीचे दोन जुने मोहरे भाजपातून घरवापसी करणार आहेत. (Bjp 2 big Leaders Joining Sharad Pawar) भाजपचे नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षाच प्रवेश करणार असल्याची माहिती  समोर आली आहे. (Madhukar And Vaibhav Pichad to join NCP) मधुकर पिचड आणि वैभव पिचड  आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले जात आहे.(Bjp Leader Madhukar Pichad to meet sharad pawar)

अकोले येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा होणार आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड  या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचेही बोलले जात आहे.(Akole Sharad Pawar Melava)  दरम्यान, याआधीही मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी  तीन वेळा शरद पवार यांच्याकडे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने सुत्रांच्या आधारे दिले आहे. त्यानंतर आजच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मधुकर पिचड आणि वैभव पिचड  उपस्थित राहणार असल्याच्या चर्चाही संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.(Sambhajinagar NCP Melava)

दरम्यान, मधुकर पिचड हे पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काही वर्षे कामही केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. (vaibhav Pichad Vs Kiran Lahamate ) त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. (2019 madhukar pichad join BJP)

आज किरण लहामटे महायुतीसोबत असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभेचे तिकीटही त्यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे.(Kiran Lahamate in Mahayuti NCP) त्यामुळे  पिचड कुटुंबियांनी पुन्हा राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय घेतला असावा, असे बोलले जात आहे.  अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर किरण लहामटेही अजित पवार यांच्यासमवेत महायुतीमध्ये सामील झाले.

दरम्यान, याच आठवड्यात पिंपरी- चिंचवड शहरातील माजी नगरसेवक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक अजित गव्हाणे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.(Ajit Pawar Leader Joined Sharad PAwar Group)  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांना पक्षात प्रवेश दिल्यास अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पण पिचड यांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा हादरा बसणार आहे.(Big Shock to Bjp In Sambhajinagar)

Latest Posts

Don't Miss