Saturday, January 11, 2025

Latest Posts

विधानपरिषद निवडणुकीत कुणाचा होणार गेम?  समजून घ्या समीकरण

| TOR News Network |

Vidhan Parishad Latest News : विधानषदेसाठी आता उमेदवारी जाहीर झाली असून १२ जुलै रोजी मतदान व निकाल लागणार आहे. (Vidhan Parishad Voting on 12th of july) या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने कोणता आमदार कोणाला मतदान करतो हे सांगता येणार नाही. मात्र यात क्राँस व्होटिंग होण्याची दाट शक्यता आहे.(Vidhan Parishad Cross Voting)

दोन वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीनंतरच राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली. शिंदे भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले. आता दोन वर्षांनी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. (12 candidate in vidhan Parishad Election) त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. या दोन आघाडींमधील कुणाचा उमेदवार पडणार? लोकसभा निवडणुकीनंतरच्या बदललेल्या संख्याबळाचा कुणाला फायदा होणार?

महायुतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून भाजपाचे 111 आमदार आहेत. (Mahayuti have 111 Mla) भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली असून सध्याचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार निवडून येतील असं मानलं जातंय. (Easy Win to Mahayuti In Vidhan Parishad) शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेचं संख्याबळ 47 आहे. यासंख्याबळाच्या जोरावर काही धक्कादायक निकाल लागला नाही तर त्यांचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीनंही 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला दोन्ही जागा जिंकण्यासाठी आणखी 7 आमदारांची गरज आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे 37 आमदार आहेत.(Congress Big Brother In Mahavikas Aghadi) या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होईल. त्यानंतर काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतील.शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत. तर शेकापचा 1 आमदार आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. महायुतीचे एकूण 202, महाविकास आघाडीचे 66 आमदार आहेत. 6 आमदार तटस्थ आहेत. त्यामध्ये  एमआयएम – 2, समाजवादी पार्टी – 2, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी -1 आणि क्रांतीकारी शेतकरी पक्ष- 1 असे 6 आमदार तटस्थ आहेत. हे आमदार या कुणाला मतदान करणार यावरही निवडणुकीचं चित्रं अवलंबून असेल.

असा आहे मॅजिक फिगर

विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक 1 या पद्धतीनं कोटा ठरतो. राज्य विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ 274 वर आलं आहे.विधानसभेच्या एकूण जागा 274 जागांचा रिक्त जागा 11 +1 म्हणजेच 12 ने भागाकार केला तर 22.833 हे उत्तर येतं. त्यामुळे विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे 23 ही या निवडणुकीतील मॅजिक फिगर आहे. (23 votes is Magic Figure)

Latest Posts

Don't Miss