Thursday, January 16, 2025

Latest Posts

ईडी वाले देखील मला म्हणाले मान गये बॉस – रोहित पवार

| TOR News Network |

Rohit Pawar Latest News :  कुसडगावचे एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रवरुन मोठा वाद पेटला आहे. भाजपच्या काळात हे केंद्र बाहेर जाणार होते. पणमहाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यात आणल्याचे वक्तव्य राष्ट्रावादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं. (rohit pawar aggrasive on jamkhead srpf centre) यावेळी आमचे विरोधक (राम शिंदे) बिस्कीट खात बसल्याचा टोलाही रोहित पवारांनी लागवला. यावेळी प्रसार माध्यमांसशी बोलताना रोहित पवार यांनी जामखेडची जनता माझ्या पाठीशी कशी उभी आहे हे ईडीच्या कार्यालयात असतानाचे उदाहरण देखील सांगितले व पुढचा आमदार मीच होणार असा विश्वास देखील व्यक्त केला.(I will be next mla says rohit pawar)

 एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्रामुळे जामखेड तालुक्यात साडे सहा हजार पोलिस राहणार आहेत. यापुढं राज्यात कुठेही पोलिसांची मदत लागली तर जामखेड तालुक्याला फोन येईल असंही रोहित पवार म्हणाले. इथं काही बॅनर इथे लागले होते, की प्रशिक्षण यांनी (राम शिंदे) यांनी मंजूर केलं, पण माझ्याकडे सर्व जीआर आहेत.(banner of ram shinde on Srpf centre approved ) तुम्ही अडीच वर्षे मतदारसंघ फिरकले सुद्धा नाहीत. पुढचा आमदार मीच होणार असल्याचा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

मी माझ्या मतदारसंघातील लहान बहीण-भावांना चॉकलेट,आणि शालेय साहित्य देतो. मला मन आहे भावना आहे म्हणून मी देतो, पण माझे विरोधक त्यावरूनही टीका करतात. पण तुम्हाला भावना नाही त्याला मी काय करु असेही रोहित पवार म्हणाले. मी कर्जत-जामखेडचा सेवक आहे. (Rohit pawar on karjat jamkhed) कर्जत-जामखेडच्या लोकांना हे लोक घाबरतात असेही ते म्हणाले. SRPF केंद्राबाहेर गेलो तर पोलीस विनंती करत होते हे लोक ऐकणार नाही तुम्हीच त्यांना सांगा. मी ईडी कार्यालयात गेलो तेंव्हा पण कर्जत- जामखेडचे लोक कार्यालयाबाहेर जमा झाले होते.(Rohit pawar on Ed office story) ED कार्यालयात गेलो तर मला पहिला प्रश्न विचारला बाहेर आलेले लोक कुठून आलेत. त्यांना वाटलं तासभर हे लोक थांबतील पण लोक शेवट पर्यंत थांबले ते मी बाहेर येई पर्यंत गेले नाहीत. ED वाले देखील म्हणाले “मान गये बॉस” असे रोहित पवार म्हणाले. ही कर्जत-जामखेडच्या लोकांची ताकद आहे, म्हणून मी दिल्लीपुढे झुकणार नाही.(Karjat jamkhed people is power to me) त्यांच्यापुढे हाच प्रश्न असतो की याला थांबवायचे कसे असे रोहित पवार म्हणाले.

काही लोक म्हणतील की मी प्रशिक्षण केंद्रात का गेलो नाही. पण हे पोलीस अधिकारी हे राज्याचे भूमिपुत्र आहेत. आपण आत गेलो असतो तर याच भूमिपुत्र पोलीसांची नोकरी गेली असती, म्हणून मी प्रशिक्षण केंद्रात गेलो नाही. तिथे काही झाले असते तर मी पहिली काठी आणि पहिली गोळी खाल्ली असती असे रोहित पवार म्हणाले. आम्ही ठरवल असतं तर पोलिसांची गाडी उचलून फेकली असती पण पोलिसांकडे पाहून आम्ही थांबल्याचे रोहित पवार म्हणाले. पण येत्या दोन महिन्यांनंतर सरकारच्या अहंकाराचा फुगा स्वाभिमानी जनता फोडेल असेही रोहित पवार म्हणाले.

Latest Posts

Don't Miss