Saturday, January 18, 2025

Latest Posts

काँग्रेसमधुनच रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीला कडाडून विरोध

| TOR News Network |

Ravindra Dhangekar Latest News : विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. (Pune Congress internal dispute) उमेदवारी देण्यावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचं समोर आलं आहे. कसब्याचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकरांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे.(oppose to Ravindra Dhangekar by Arvind Shinde) पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची पक्षाकडे मागणी केली आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रविंद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षपणे विरोध केला आहे. (Dhangekar Candidacy oppose by Pune Congress Leader ) माध्यमांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. जे उमेदवार पक्षाचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मलिकार्जून खर्गे यांचे फोटो बॅनर्सवर लावणार नाहीत अशांना उमेदवारी देऊ नका. व्यक्तिगत राजकारण करणाऱ्यांना पक्ष संधी देणार नाही. कोणी काँग्रेस विचाराशी एकरूप नसेल तर असा कोणी उमेदवार असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी पक्षाकडे केली आहे.(Pune Congress President Shinde to oppose Dhangekar)

तुमचा रोख कुणाकडे आहे? असा आम्ही त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा माझा रोख काँग्रेसमधील कोणी एका व्यक्तीकडे नाही. तर शहरात असं कोणी काँग्रेस नेता असेल कोणी पदाधिकारी हे काँग्रेस बैठक किंवा आंदोलनला 50 टक्के उपस्थितीत नसतील. त्यांना उमेदवारी देताना विचार करावा. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या आम्हाला मान्य असेल. 22 जणांनी विधानसभा निवडणुकीत आठ मतदारसंघात इच्छुक आहेत, असं शिंदे म्हणाले.

पुण्यात काल काँग्रेसची पक्ष विभागीय बैठक पार पडली. (Pune Congress Meeting) त्यात शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे अंतर्गत नाराजी आणि खतखद व्यक्त केली. पुणे शहरातील पाच जागा मागितल्या आहेत. शहरात आठ मतदारसंघ आहेत. पहिल्या तीन आणि आता हडपसर आणि पर्वती मतदारसंघ मागितला आहे. या दोन्ही ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत आणि मतदार आहे. मित्र पक्षाकडे सध्या उमेदवार नाहीत. आम्ही या जागा जिंकू शकतो. पूर्वी हडपसर आणि पर्वती हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे होते. तिथं आमचा उमेदवार निवडूव येऊ शकतो, असंही अरविंद शिंदे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss