Saturday, January 18, 2025

Latest Posts

फडणवीसांनी फकीर म्हटंलेला उमेदवार निघाला कोट्याधीश

| TOR News Network | Mahayuti Candidate Parbhani News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणकरांना फकीराची उपमा दिली होती. महादेव जानकर यांना कोठेच घरदार नाही ते रेल्वे स्टेशनवरही झोपू शकतात, असे ते म्हणाले होते.मात्र आता ते कोट्याधीश असल्याचे समोर आले आहे. महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर (Mahayuti candidate mahadev jankar) यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रामधून समोर आली आहे. (Crore wealth of mahadev jankar) त्यांच्याकडे सोने-चांदीचे दागिने, जमीन, एफडी, गोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे एकूण पाच कोटींची संपत्ती आहे.(5 crore property wealth of jankar)

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना उमदेवारी अर्ज दाखल करताना संपत्ती आणि गुन्हे यासंदर्भातील शपथपत्र दाखल करावे लागते. त्या शपथपत्रामुळे कोणावर किती गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती समोर येऊ लागली आहे. तसेच कोणाकडे किती संपत्ती आहे, ती माहिती मिळत आहे.

महादेव जानकर मूळचे पळसवाडी जिल्हा सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यांनी शपथपत्रात आपला व्यवसाय शेती हा दर्शविला आहे. जाणकारांच्या नावावर अठरा एकर 14 गुंठे एवढी शेती आहे. (8 acer farm on name of jankar) त्यांच्याकडे चल आणि अचल दोन्ही मिळून जवळपास पाच कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामुळे स्वतःला फकीर म्हणणाऱ्या महादेव जानकर यांच्याकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.(Crore of property on name of mahadev jankar)

महादेव जानकर यांच्याकडे चलसंपत्ती एक कोटी 25 लाख दहा हजार 598 रुपये एवढी आहे. (Mahadev jankar property details) यामध्ये त्यांच्याकडे कॅश इन हॅन्ड 27 हजार 330 रुपये आहेत. तर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 51 लाख 66 हजार 779 रुपयाची एफडी करण्यात आल्या आहेत. (51 lakh fd on name of jankar) त्याचबरोबर गोल्ड बाँड स्कीममध्ये 791 ग्रॅम सोन्यात गुंतवणूक केली आहे. त्याचे मूल्य 29 लाख 96 हजार 3008 रुपये एवढे आहे. जानकर यांनी पीपीएफ खात्यात 2019-20 साठी दीड लाख रुपये तर मार्च 2024 मध्ये दोन लाख 25 हजार 845 रुपये आहेत. जानकरांकडे 200 ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने असून त्याचे बाजारमूल्य 13 लाख 65 हजार एवढे आहे. सर्व अचलसंपत्ती एक कोटी 25 लाख 10 हजार 598 रुपये एवढी आहे.

कुठे-कुठे आहेत जमीन

महादेव जानकर यांच्याकडे अचल संपत्ती देखील तीन कोटी 62 लाख 99 हजार 760 रुपये एवढ्या किमतीची आहे. त्यामध्ये महादेव जानकर यांच्याकडे शेत जमीन, रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी आणि कमर्शियल प्रॉपर्टी याचा समावेश आहे. जाणकारांची शेतजमीन सातारा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, बीड, सिंधुदुर्ग रायगड या ठिकाणी आहे. तर अ कृषिक जमीन हे सोलापूर, जालना या जिल्ह्यात आहेत. जाणकारांच्या कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी देखील आहेत. (Commercial property of jankar) त्या रायगड, पुणे ,अहमदनगर, मुंबई या ठिकाणी आहेत.(Many property of jankar in maharashtra) जाणकारांची चल आणि अचल हे द्य दोन्ही संपत्ती मिळून जवळपास त्याचे बाजार मूल्य पाच कोटी रुपयांचे होत आहे.

Latest Posts

Don't Miss