Saturday, January 11, 2025

Latest Posts

ठाकरेंचं मोदींना आव्हान, तुम्ही विधानसभेचा प्रचार आत्तापासून सुरु करा

| TOR News Network |

Uddhav Thackray Latest News : विधानसभेचा प्रचार आत्तापासून सुरु करा, हे माझं मोदींना आव्हान आहे. (Uddhav Thackray challenge Pm modi) फक्त या षंढांना बाजूला ठेवा. शिवसेनेचं नाव, शिवसेनेचं चिन्ह बाजूला ठेवा, असं आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदींना दिलं. मिंदे आणि भाजपला सांगतो तुम्ही षंढ नसाल तर  बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना नाव न लावता निवडणूक लढा. मिंदेच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा.(Uddhav Thackray On Eknath Shinde) विधानसभेसाठी मोदी तुम्ही सभा घ्या. या मिंदेला बाजूला ठेवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते शिवसेनेच्या 58  व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.(UBT Shivsena Anniversary)

या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंपूर्वी खासदार संजय राऊत यांचंही भाषण झालं. त्यांनी या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. (Sanjay Raut Slams Pm Modi) ‘नरेंद्र मोदींचा खुळखुळा कुणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला आहे, अशी टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी लगावला. मोदी आधी एक ब्रँड होता पण आता ती देशी ब्रँडी झाली आहे.  देशभरातील विविध पक्ष फोडून भाजपने 110 विजय चोरले आहेत, नाहीतर भाजप 120 वर अडकलाय. (Sanjay Raut on Bjp Loksabha Seat) जिथे जिथे मंदिर आणि हिंदुत्व तिथे भाजप हरले.  जिथे राम तिथे त्यांचा पराभव झाला,’ अशी टीका राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विधानसभा निवडणुकीचा प्रचार आत्तापासून सुरु करा, असं आव्हान दिलं.( Uddhav Thackray Challanged Pm Modi For Vidhansabha) एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं नाव आणि चिन्ह बाजूला ठेवावं. त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवावी, असं सांगत उद्धव यांनी यावेळी राज ठाकरेंनाही नाव न घेता टोला लगावला.

निवडणूक झाली की उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएत जाणार हा गैरसमज पसरवण्यास सुरुवात केली.(Uddhav Thackray On NDA) ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. आपल्या मातेसमान शिवसेनेला संपवायचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत परत जायचं? असा सवाल करत ठाकरे यांनी एनडीए मध्ये जाण्यााची चर्चा फेटाळून लावली.

Latest Posts

Don't Miss