Saturday, January 18, 2025

Latest Posts

ठाकरे गटाकडून या दोन नेत्यांना विधानपरिषदेची उमेदवारी

| TOR News Network |

Vidhan Parishad Election 2024 : राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. दोन शिक्षण मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघात 26 जून रोजी मतदान होणार आहे.(Vidhan Parishad Voting on 26 june) त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीतून कोणाला उमेदवारी देण्यात येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.(Mahayuti in Vidhan Parishad Election) तर दुसरीकडं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आघाडी घेत आपल्या पक्षाच्या शिक्षक आणि पदवीधर संघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.(Uddhav thackeray on Vidhan Parishad)

ठाकरे गटाकडून शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. पदवीधर मतदार संघातून माजी मंत्री अनिल परब (Anil Parab Candidate For Vidhan Parishad) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर (Abhayankar From Shivsena) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Uddhav thackeray declared Candidancy for Vidhan Parishad)

गेल्या बारा वर्षांपासून विधानपरिषद मतदारसंघातून अनिल परब प्रतिनिधित्व करताय. पक्षाच्यावतीनं यंदा पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आलीय. (Anil Parab Again For Vidhan Parishad) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून अनिल परब यांच्याकडे पाहिलं जातं. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात परिवहन खातं अनिल परब यांनी सांभाळलंय. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर आणि शिंदे फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर ठाकरे शिवसेनेतून अनेक दिग्गज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्याचं चित्र संपूर्ण राज्यानं पाहिलंय. पेशानं वकील असलेले अनिल परब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी न्यायालयीन लढाईत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.

म्हणून मतदान 26 जून रोजी

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम अगोदरच जाहीर झाला होता. 10 जून रोजी दोन शिक्षक मतदार संघ आणि दोन पदवीधर मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार होती. (Vidhan Parishad Date Change) मात्र, शिक्षक संघटनांनी विरोध केल्यामुळं हे मतदान 26 जून रोजी होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघात तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात सदरची निवडणूक पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्याची अंतिम मुदत सात जून 7 जून असून 12 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येईल. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. (Vidhan Parishad Counting on 1 july)

Latest Posts

Don't Miss