Monday, November 18, 2024

Latest Posts

धारावीत तणाव; वाहनांची तोडफोड, रस्ता रोको

| TOR News Network |

Dharavi Tension Latest News : मुंबईतील धारावी परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरुन मोठा वाद झाला आहे. त्यामुळे धारावीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. (Tension in Dharavi)

धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडल्याने तणापूर्ण वातावरण आहे. आज सकाळी मुंबई महापालिकेचं पथक धारावीत दाखल झालं. (Dharavi Mosque Demolished Issue) बीएमसीचं पथक धारावीत आल्यानंतर काही नागरिकांनी त्यांना अडवलं. संतप्त नागरिकांनी बीएमसीच्या वाहनाच्या काचा फोडल्या. तर रस्ताही अडवण्यात आला.(People on road in dharavi) पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बंदोबस्त वाढवला. स्थानिकांनी चर्चा करत पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थितीवर मार्ग काढायला सुरुवात केली. पण सध्या धारावीत तणावपूर्ण परिस्थिती आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. धारावी पोलीस स्टेशनबाहेरही नागरिकांचा जमाव आहे. धारावीत पोलीस स्टेशनला धारावीकरांनी घेरलं आहे.

धारावी परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मुंबई महापालिकेचे पथक सकाळी पोहोचले.(Bmc to demolish Mosque in dharavi) यावेळी काही लोकांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काहींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोडही केली. यानंतर काही मिनिटातच मोठ्या प्रमाणात जमाव तिथे जमा झाला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी सुरुवातीला काही लोक रस्त्यावर बसून आंदोलन करत होते. पण त्यानंतर काहींनी आजूबाजूला असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. तर काही आंदोलकांकडून धारावीतून जाणारे रस्तेही रोखण्यात आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस बंदोबस्तात वाढ केली. यानंतर पोलिसांची स्थानिकांशी चर्चा केली. तसेच याप्रकरणी मार्ग काढण्याचा प्रयत्नही केला. गेल्या दोन तासांपासून धारावीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरे गटाचे काही पदाधिकारी धारावीत दाखल झाले आहे. त्यांनी पोलिसांची भेट घेत याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहेत. तर या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

Latest Posts

Don't Miss