Sunday, November 17, 2024

Latest Posts

माझ्या मनात तीन वेळा आत्महत्याचा विचार आला होता : Mohammed Shami

 

काय कारण होते की शमीच्या मनात आला होता असा विचार

Mohammed Shami Story: यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंड विरुध्द झालेल्या उपांत्य सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले.त्याने तब्बल 7 गडी बाद करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. वनडे क्रिकेटमध्ये शमीने चौथ्यांदा पाच विकेट काढले. त्याशिवाय आणखी एक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. वर्ल्ड कपमध्ये 50 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनलाय. परंतु शमीच्या खाजगी आयुष्यात अनेकदा वाईट वळण आले आहे. त्याच्या मनात 3 वेळा आत्महत्याचा विचार आला होता. (World Cup 2023 Semifinal Match Hero Mohammed Shami Thought Three Times To End His Life )

2015 वनडे वर्ल्ड कपनंतर शमी पुन्हा कमबॅकच्या प्रयत्नात होता. त्याच्या पर्सनल लाइफमध्येही बऱ्याच घटना घडलेल्या. त्याच्या नशिबात काही वेगळच लिहिलं होतं. त्याला कुटुंबाची साथ मिळाली. वाईट काळाशी संघर्ष करुन आज मोहम्मद शमी इथे पोहोचला. 2020 साली कॅप्टन रोहित शर्मासोबत एका इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये त्याने मनात सुसाइडचा विचार आल्याचा खुलासा केला. “2015 वर्ल्ड कपमध्ये मला दुखापत झाली. त्यानंतर मैदानावर पुनरागमन करण्यासाठी मला 18 महिने लागले. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. रिहॅब किती कठीण असतं, ते तुम्हाला माहितीय. दुसऱ्याबाजूला कौटुंबिक समस्या होत्या. पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप लावले होते.त्यात त्याचे मानसीक संतुलन बिघडत जात होते. हे सर्व सुरु होतं. त्याचवेळी आयपीएलच्या 10-12 दिवसाआधी माझा अपघात झाला. मीडियात माझ्या खासगी आयुष्याबद्दल बरच काही चालू होतं” असं मोहम्मद शमी म्हणाला होता. “जर मला माझ्या कुटुंबाची साथ मिळाली नसती, तर मी क्रिकेट सोडून दिलं असतं. 3 वेळा आत्महत्येचा विचार माझ्या मनात आला होता. माझ घर 24 व्या मजल्यावर होतं. मी अपार्टमेंटमधून खाली उडी तर मारणार नाही ना, असं माझ्या कुटुंबाला वाटायच” हे शब्द आहेत, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचे. पण वेळेबरोबर अडचणी कमी झाल्या आणि मोहम्मद शमीने एक नवा इतिहास रचला. आज सगळ्या क्रिकेट विश्वाने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची ताकत मान्य केलीय.

Latest Posts

Don't Miss