Saturday, January 18, 2025

Latest Posts

Team INDIA ची दिवाळी भेट – भारताने नेदरलॅडला लोळवत मोडला हा विक्रम

India Netherlands World Cup Match 2023: २००३ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग आठ सामने जिंकले होते. त्या विश्वचषकातील त्यांचा सर्वाधिक सलग विजयांचा विक्रम आज रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या नव्या दमाच्या टीम इंडियाने मोडून काढला. (India Won its 9th Consecutive Match in world cup 2023) भारताने बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर  झालेल्या सामन्यात नेदरलॅडला 160 धानांनी पराभूत करत आपला यंदाच्या विश्वचषकातील सलग 9 वा विजय नोंदवला.

भारताने दिलेल्या 410 धावांचे विजयी लक्ष्य गाठताना नेदरलॅडची सुरुवात निराशाजनक झाली.सलामीवीर वेस्ली बॅरेसीला मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात परतावून लावले.त्यानंतर कॉलिन एकरमनला बाद करण्यात यश आले.विशेष म्हणजे या सामन्यात विराट कोहलीने स्कॉट एडवर्ड्सला झेलबाद करत सामन्यातील रंगत कमी करण्यात भर घातली.अशात नेदरलॅडचे एक एक खेळाडू निर्धारित वेळेत बाद होत गेले.नेदरलॅडच्या एका ही फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही.याचे यश भारतीय गोलंदाजाना जाते.रविंद्र जडेजा,कुलदीप यादव,जसप्रित बुसरा,मोहम्मद सिराज यांनी नेदरलॅडच्या फलंदाजांना बांधून ठेवले. अखेर 47.5 षटकात शमीने अखेरचा बळी घेत नेदरलॅडला 160 धावांनी पराभूत केले.तत्तपूर्वी भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.सलामीवीर रोहित शर्मा (61) आणि शुभमन गिल (51) या जोडीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी अर्धशतक ठोकत 12 व्या षटकात भारताला शंभरी गाठून दिली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीनेही 56 चेंडूत 51 धावा करत धावफलकाचा आलेख वाढवला. विराट बाद होताच आलेल्या श्रेयस अय्यरने उत्कृष्ट फलंदीजी केली. श्रेयसने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तर दुसऱ्या बाजूने असलेल्या के.एल.राहुलने तूफानी पारी खेळत केवळ 62 चेंडूत आपले शतक पूर्ण करत भारताला 400 धावांचा पल्ला गाठून देण्यास मोलाचे योगदान दिले. भारताने 50 षटकात 4 गडी गमावत 410 धावा केल्या.

Latest Posts

Don't Miss