Monday, November 18, 2024

Latest Posts

Team India च्या विजया मागे PM Modi

प. बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांचा व्हिडीओ व्हायरल

रविवारी भारतीय संघाने द.अफ्रिकेसोबत झालेल्या सामन्यात आपला सलग आठवा विजय नोंदवला. भारताने अफ्रिकेवर २४३ धावांनी दणदणीत विजय नोंदवत पाॅईंट टेबलवर आपले अग्रथान कायम राखले आहे. (West Bengal Governer C.V. Bose Statement On Indian Cricket Team Video Goes Viral) या विजयानंतर अनेक मान्यवरांनी  आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. यातच आता  प. बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी या विजयावर दिलेल्या प्रतिक्रीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे…नेमके काय म्हणाले राज्यपाल बोस..

भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकात कमालीची कामगिरी करत आहे.विशेष करुन भारतीय गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.केवळ वेगवानच नाही तर फिरकीपटूंनी अफ्रिकेसोबत झालेल्या सामन्यात आपला जलवा दाखवला आहे.रविंद्र जडेजाने पाच बळी टिपत चाहत्यांच्या मनात घर केले आहे.विराट कोहलीच्या वाढदिवसाला त्याने शानदार फदंजाचा नजराने पेश करत दमदार शतक ठोकले आणि सचिन तेंडुलकरच्या  एक दिवसीय सामन्यातील ४९ शतकाची बरोबरी साधली आहे. त्यात रोहित शर्मा (४०) व श्रेयस अय्यरने (७७) धावा जोडत भारताची धावसंख्या ३२६ पर्यंत नेण्यास मोलाचे योगदान दिले आहे.तर विजयी लक्ष्य गाठण्यासाठी मैदानावर उतरलेल्या अफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांना केवळ ८३ धावांवर रोखण्यात यश आले आहे. कोलकाताची खेळपट्टीवर अगदीच  फिरकीपटूंची मक्तेदारी दिसून आली आहे.या मोठ्या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवर मंडळी या विजयावर आपल्या प्रतिक्रीया नोंदवत आहेत.अशातच प. बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांनी भारताच्या या विजयावर दिलेली प्रतिक्रिया समाज माध्यमांवर चांगलीत व्हायरल होत आहे.त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या व्हिडीओवर आता विरोधकांकडून टीकेची फैर झाडली जात आहे. राज्यपाल बोस यांनी  भारतीय संघाचे अभिनंदल केले आहे.त्यांनी पंतप्रधान यांच्या आत्मनिर्भर भारताचा दाखला देत भारत इतर क्षेत्राप्रमाणे आता क्रीडा क्षेत्रात देखील भरारी घेत असल्याचे म्हणटंले आहे.आपण आवघ्या जगाला आत्मनिर्भर झालो असल्येचे या विजयाने सिध्द केले आहे.त्यांच्या वक्तव्यावर आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार साकेत गोखले यांनी त्यांच्या या प्रतिकेवर आक्षेप नोंदवला आहे.ते म्हणाले विराट कोहलीचे शतक आणि भारतीय संघाच्या विजयाचे श्रेय मोदींना ? भारतीय जनता पार्टी आपला अजेंडा राबवण्यासाठी अशा लोकांना राज्यपाल म्हणून नियुक्त करत असून ते वरिष्ठ नेत्यांना खूष करण्यासाठी असे वक्तव्य करत असल्याचे गोखले यांनी अ्ॅक्स वर म्हटंले आहे.

Latest Posts

Don't Miss