Saturday, January 11, 2025

Latest Posts

टीम इंडिया भारतात दाखल : रोहित,पांड्याने धरला ठेका

| TOR News Network |

Team India Arrived Updates: टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन सकाळी 7 वाजताच्या सुमारास दिल्लीच्या एअरपोर्टवर दाखल झाली.(Team India Arrived At Delhi Airport) यावेळी चाहत्यांनी टीम इंडिया येणार यासाठी एअरपोर्टवर गर्दी केली होती. रोहित शर्मा हातात ट्रॉफी घेऊन आल्यावर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. (Rohit Sharma with world cup trophy) यानंतर दिल्ली एअरपोर्टवरून टीम इंडिया हॉटेलमध्ये गेली. यावेळी हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना ढोलाच्या तालावर रोहित शर्माने ठेका धरला. (Rohit Sharma Dance At hotel)

टीम इंडिया दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये थांबले आहेत. (Team India At ITC maurya hotel delhi)  टीम इंडियाचे खेळाडू एअरपोर्टवरून थेट हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी हॉटेलच्या प्रवेशद्वाराजवळच ढोलाच्या गजरात टीम इंडियाच्या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं. पंजाबी ढोल ऐकताच रोहित शर्मा स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याने ठेका धरला. ढोलाच्या तालावर रोहित शर्माने अगदी मनसोक्त डान्स केला आहे.

रोहितनंतर सूर्याही मागे राहिला नाही. (Rohit,surya Dance At hotel) त्यानेही या तालावर भांगडा करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे या व्हिडीओमध्ये ऋषभ पंतच्या हातात ट्रॉफी आहे आणि त्याने देखील हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी ठेका धरला.

बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ सकाळी दिल्लीत पोहोचला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.(Team india to visit Pm House) दुसरीकडे पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ट्रॉफीसह मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे.(Team India Rally At mumbai)

गुरूवारी भारतीय संघ विजयी परेड मुंबईत करणार आहे.  यासाठी रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय.(Rohit Sharma Invitation to cricket lover) रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया.”(t20 winning celebration at wankhade stadium)

Latest Posts

Don't Miss