Sunday, January 12, 2025

Latest Posts

मला माहिती नव्हती की तो विवाहित आहे

अश्‍वजीत गायकवाडने प्रेयसीला कारखाली चिरडल्याचे प्रकरण

Ashwajeet Gaikwad Case: घोडबंदर रोडवरील ओवळा भागात अश्‍वजीत गायकवाड या 34 वर्षीय मुलाने आपल्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडले.(Youth Beaten His Girlfriend And Trying To Killed Her In Thane) यामध्ये पीडिता जबर जखमी झाली आहे. तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या बद्दल पिडीतेने प्रतिक्रिया दिली असून ती म्हणाली मला माहित नव्हते की तो विवाहित आहे.

पीडितेने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. दरम्यान, अश्‍वजीत हा एमएसआरडीसी खात्यात काम करणाऱ्या बड्या अधिकाऱ्याचा पुत्र असल्याने खळबळ उडाली आहे. घोडबंदर येथे राहणाऱ्या पीडित महिला या उच्चशिक्षित आहेत. या महिलेला सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजेच्या सुमारास तिचा प्रियकर अश्र्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. महिला तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यात काही वाद झाले. आरोपी अश्‍वजीत  गायकवाड याने आपल्या प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तसेच तिच्या डाव्या हाताला देखील चावा घेतला.

आरोपी अजुनही मोकाट

दरम्यान यावेळी आरोपीचा मित्र असलेल्या रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी देखील चारचाकी गाडी पीडितेच्या अंगावर घातली. या घटनेत पीडितेच्या पायाला जबर मारहाण झाली असून शरीरावर जखमा झाल्या आहेत. संबंधित घटनेप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी मोकाट आहेत. दरम्यान, अश्वजीत गायकवाड हा ठाण्यातील अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीयदृष्ट्या जोडलेला असून त्याचे वडील एमएसआरडीसी अधिकारी आहे.

साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध

पीडिताने सांगितले आहे की, गेल्या साडेचार वर्षांपासून माझे अश्वजीत गायकवाड सोबत प्रेमसंबंध आहे. मात्र मला माहिती नव्हती की तो विवाहित आहे. मला त्या रात्री माहिती पडले की, तो विवाहित आहे. या अगोदर त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. मी त्याला भेटण्यासाठी सांगितले. त्या ठिकाणी त्याची पत्नी सोबत होता. माझ्या बरोबर त्याने वाद घातला. माझ्यावर हल्ला केल्यानंतर मला शरीरावर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी त्यावेळेस कोणतीही कारवाई केली नव्हती. माझ्या इंस्टाग्राम पोस्टमुळे आता कुठे पोलीस जागी झाली आहेत, अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

या प्रकरणावर ठाण्याचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेने पुन्हा जबाब नोंदवण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने देखील पोलीस पुन्हा जवाब नोंदवून घेणार आहेत. तसेच या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच त्या ठिकाणी असणारे साक्षीदार यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. संबंधित प्रकरणातील तीनही आरोपी फरार आहेत.

Latest Posts

Don't Miss