Monday, January 13, 2025

Latest Posts

मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नसतो

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने खळबळ

राज्याचे आरोग्यमंत्री  डॉ. तानाजी सावंत हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.या वेळी त्यांनी थेट छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षकांना (SP) धारेवर धरत खडे बोल सुनावले. का संतापले आरोग्य मंत्री आणि कोणाला काय दिला इशारा.. काय आहे ते प्रकरण. (Maharashtra Health Minister Dr. Tanaji Sawant’s Statement Goes Viral)

धाराशिव येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. या पदावर येण्यासाठी इच्छुक असलेले निलंबित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी थेट पालकमंत्री सावंत यांच्याकडूनच दबाव आणल्याची चर्चा आहे.आंबेजोगाई येथे अवैद्य धंद्यांना अभय, आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात कुचकामी ठरलेल्या मोरे यांच्यावर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः निलंबनाची कारवाई केली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये निलंबित झालेल्या मोरे यांनी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या नियुक्तीसाठी जोर लावला होता. सावंत यांनी चक्क कार्यकर्त्यांच्या घोळक्यात जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना धारेवर धरले. सावंत म्हणाले धारशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त झालेल्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून वासुदेव मोरे यांची नियुक्ती करा, त्यांची ऑर्डर आजच्या आज काढा, मी सांगेल ते करायचं. मी सांगितले तसेच झाले पाहिजे, चर्चा- बिर्चा काही नाही, असे सांगताना आपण मुख्यमंत्र्याचं देखील ऐकत नाही अशी दमबाजी पालकमंत्री डॉ.सावंत यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सार्वजनिक ठिकाणी केली आहे.त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र हा व्हिडीओ नेमका किती दिवसांपूर्वीचा आहे हे यातून स्पष्ट होत नाही. मात्र,याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली असल्याची चर्चा आहे.मात्र सावंतांच्या या वक्तव्यामुळे त्यांची मनमानी वाढली का असा प्रश्न समोर आला असून शिंदे गटाकडून त्यांती समजूत काढल्या जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Latest Posts

Don't Miss