Saturday, January 11, 2025

Latest Posts

मलाही आपली मुलगी समजून सांभाळून घ्या

| TOR News Network | Rohini Khadse Latest News : मला या पक्षाची विचारधारा आवडते.(I like the ideology of this party) पक्षाचं नेतृत्व आवडतं आणि नेतृत्वात असलेली जिद्द आवडते. आमच्या वाईट काळात आपण आम्हाला साथ दिली.(You supported us in our bad times) ते आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. म्हणूनच मला या पक्षात थांबायचं आहे. सुप्रिया सुळे जशी तुमची कन्या आहे. तसंच मलाही तुमची मुलगी समजून सांभाळून घ्या. सुप्रिया यांच्यासारखंच माझ्यावरही प्रेम करा, (Love me like your daughter)असं आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना केलं.

रावेर लोकसभेच्या पक्षाच्या उमेदवाराला लीड देण्याचं काम मी करेल. तुतारी चिन्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणायचं आहे. आपले उमेदवार संसदेत पाठवायचे आहेत. पवार साहेबांनी राज्यातील वातावरण फिरवलं आहे.(Pawar has changed the atmosphere in the state) त्यामुळे विजय आपलाच होणार आहे, (victory will be ours) असं सांगतानाच जिल्हा बँकेत कर्जासाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावं लागत आहे, त्यांनाही न्याय द्यायचा आहे, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी रोहिणी खडसे यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मला आठवतं नाथाभाऊ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पवार साहेबांच्या समोर रोहिणी यांनी सांगितलं की, नाथाभाऊंना कुठे जायचं तिकडे जाऊ दे, पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. (Jayant patil on sharad pawar)काही झालं तरी मी तुमच्यासाठी काम करणार आहे. वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असताना मुलीने वेगळा निर्णय घेणे हे सोप्पं काम नाही. पण रोहिणीताईंनी तो निर्धार केला. पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत.(Rohini khadse blessed by sharad pawar) या विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्या उमेदवाराला तुम्ही लीड द्याल यात शंका नाही. पण उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणीताई या आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून इथे उभा राहणार आहेत. (Rohini khadse candidate for vidhan sabha) त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीन उभे राहावे लागेल, असं जयंत पाटील म्हणाले.

Latest Posts

Don't Miss