Saturday, January 11, 2025

Latest Posts

ईडीने सुरू केला ताडोबाच्या १२ कोटींच्या घोटाळ्याचा तपास

| TOR News Network | Tadoba Scam Latest News : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १२ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांच्या ऑनलाईन तिकीट घोटाळ्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेने सुरू केली आहे. (12 cr scam in tadoba) हा तपास आता मनी लॉड्रिंगच्या संशयातून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Ed doubt about money laundering in tadoba) ईडीने या प्रकरणात उडी घेतल्याने आता वन विभागात खळबळ उडाली आहे.(Ed Enter in tadoba scam case)

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन तिकीटचे काम चंद्रपूर वाईल्ड लाईफ कनेक्टीविटी सोल्युशन (डब्ल्यूसीएस) या अभिषेक विनोदसिंह ठाकूर व रोहित विनोदसिंह ठाकूर यांच्याकडे होते. (Chandrapur Wildlife Connectivity Solutions) या दोघांनी मिळून ऑनलाईन तिकीट विक्रीत १२ कोटी १५ लाख ५० हजारांचा गैरव्यवहार केला. (12 cr 16 Lack Scam in Tadoba) या आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात ठाकूर बंधूंना अटक झाली. (Thakur brother arrested in tadoba scam) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना या आर्थिक गुन्ह्याची पाळेमुळे अधिक खोलवर असल्याची शंका आली. त्यामुळे डॉ. रामगावकर यांनी ईडीकडे या गुन्ह्याचा तपास करण्याची विनंती केली. (Dr. Jitendra Ramgaonkar requested ed)डॉ. रामगावकर यांच्या विनंतीनंतर ईडीने तपास सुरू केला आहे. (Ed Started Investigation of tadoba scam)

१८ ऑगस्ट २०२३ ला दिली होती तक्रार

डब्ल्यूसीएसच्या कंपनीच्या विरोधात १८ ऑगस्ट २०२३ ला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या विभागीय वनाधिकाऱ्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. दरम्यान, ठाकूर बंधू फरार झाले होते. मात्र, त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

Latest Posts

Don't Miss