Sunday, November 17, 2024

Latest Posts

अहो शेलार… राजकीय संन्यास कधी घेता

| TOR News Network |

Sushma Andhare On Ashish Shelar : लोकसभेत एनडीएला हवी तशी कामगिरी करता आली नसली तरी  तडजोड अंती ते सत्ता स्थापनेचा दावा करतील. तसेच भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.(Big Loss To Bjp in Loksabha) उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही भाजपची पिछेहाट झाली आहे. तर इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले आहे. (Big success to India Aghadi)अशात भाजप आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पूर्वी केलेले एक विधान पुन्हा चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा त्यांनी केली होती. (Ashish Shelar On India Aghadi) त्यांच्या याच घोषणेचा दाखला देत शिवसेना उबाठा गटाकडून त्यांना डिवण्यात आलं आहे.

शिवसेना उबाठा गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी शेलार यांना उद्देशून एक खोचक ट्विट केलं आहे. ‘ आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना…(Shushma Andhare Taunt to Ashish Shelar) म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी , लोटी , सगळं देता येईल.. !’अशी खोचक टीका करत अंधारे यांनी शेलार यांना टोला लगावला. (Shushma Andhare Tweet On Ashish Shelar)

लोकसभेच्या निकालानंतर आशिष शेलार यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला. आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम येथील विधासभेचे आमदार आहेत. त्यांना उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यात येत होती, पण त्यांनी नकार दिल्याने नंतर भाजपाने ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पण या लढतीत त्यांचा दारूण पराभव झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्वल निकम यांना पराभूत करून विजय संपादन केला. (Varsha Gaikwad Won From North Central Mumbai)

Latest Posts

Don't Miss