Monday, January 13, 2025

Latest Posts

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश

| TOR News Network | Sushma Andhare Helicopter News : राज्यभरात निवडणूक प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे फिरत आहेत. त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. (Sushma andhare’s helicopter crashed) शुक्रवारी सकाळी हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. परंतु सुषमा अंधारे यांनी आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. या अपघातामध्ये पायलेट सुखरुप आहे. (In mahad Sushma andhare helicopter crashed)

 सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत. तांत्रिक कारणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. (Andhare helicopter crashed due to technical fault) महाडमध्ये सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच हे क्रॅश झाले.  तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे  शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर आल्या होत्या. परंतु त्यापूर्वी अपघात झाला. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे.(Helicopter crashed at mahad)

सुषमा अंधारे यांनी सांगितले की, एका दोन दिवसांत दोन तीन सभा होत्या. निघण्यापूर्वी आम्ही हेलिपॅडवर आला. त्यावेळी हेलिकॉप्टरने दोन, तीन घिरट्या मारल्या आणि आचानक हेलिकॉप्टर कोसळले.(And suddenly helicopter crashed) मी आणि विशाल गुप्ते या हेलिकॉप्टरने जाणार होतो. परंतु सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आम्ही सर्व सुखरुप आहोत, असे त्यांनी सांगितले.

अंधारे यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचा व्हीडिओ :

Latest Posts

Don't Miss