Thursday, January 16, 2025

Latest Posts

सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रानं काँग्रेसमध्ये खळबळ

| TOR News Network |

Sushilkumar Shinde Latest News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ‘फाईव्ह डेकेड्स इन पॉलिटिक्स’ (Five Decades in Politics) ह्या त्यांच्या राजकीय आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन झाले.( sushilkumar shinde Autobiography) यात त्यांनी मांडलेल्या काही कथनामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.( congress in trouble over sushilkumar shinde Autobiography )

स्वातंत्र्यावीर सावरकरांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा पुरस्कार केला आहे.(Sushilkumar shinde on sawarkar) स्वातंत्र्यवीर सावरकर हे तत्वज्ञ आणि विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धारासाठी काम केले, असं शिंदे यांनी आत्मचरित्रामध्ये म्हंटलं आहे.

शिंदे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाची कोंडी झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे. या टीकेवर अद्याप काँग्रेसच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्यानं थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावेळी शिंदे यांनी सावरकर प्रेमाचं प्रदर्शन करत पार्टी हायकमांडची कोंडी केली आहे. काँग्रेसच्या वाटचालीवरही सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय आत्मचरित्रात भाष्य केलं आहे. (sushilkumar shinde on congress) काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणली पाहिजे. पक्ष आतून मजबूत असला तरच तुम्हाला सत्ता मिळते, असं शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

25 मे 1983 ला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळयाच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर असल्याने मी त्या कार्यक्रमाला गेलो. अस्पृश्यता आणि जातीयवाद निवारणात सावरकरांचे मोठे काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब देवरस हे त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हजर होते.

सावरकरांचा मुद्दा निघाला की आपण त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर इतका भर का देत असतो ? त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला इतर अनेक पैलू आहेत. त्यांच्यातला तत्वज्ञ आणि विज्ञानवादी आपण पाहू शकत नाही का ? वास्तविक सामाजिक समता आणि दलितांच्या उद्धाराचा मुद्दा घेऊन सावरकर उभे राहिले.  त्यामुळे त्यांना अनेकदा त्रास सोसावा लागला. सावरकरांबाबतचे संकुचित विचार हे आपल्यासमोरचं एक आव्हान आहे असं मी मानतो.

सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या वाटचालीबाबत देखील त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात मत मांडलं आहे. प्रदीर्घ काळ राजकारणात काम केल्यानंतर मला असे वाटते की, काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे.

मला असेही वाटते की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हा आपला नेता असतो, मग तो कोणत्याही राज्याचा असो. आणि आपण प्रदेशाध्यक्षांकडे पुरेसे लक्ष दिले पाहिजे. मात्र हे होत नाही. यामागचं कारण मला असं वाटतं की, राजकिय सत्ता आणि मुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदांचाच मोह असतो. पण इथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की, पक्ष आतून मजबूत असला तरच तुम्हाला सत्ता मिळते. ह्याची बरीचशी उदाहरणं आपण अलीकडच्या काळात अनेक राजकीय पक्षात पाहात आहोत,’ अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss