Saturday, January 11, 2025

Latest Posts

गडकरी यांना मुख्य प्रवाहातून बाहेर केलं गेले

खासदार सुप्रिया सुळेंचं खळवळजनक वक्तव्य

| TOR News Network | Supriya Sule Latest Statement On Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एक देशाचे वजनदार नेते आहेत.त्यांना कोणत्याच प्रकारच्या परिचयाची गरज नाही. त्यांचं काम बोलते. देशाच्या विकासात त्यांचं योगदान मोठे असून ते विसरता येणार नाही. मात्र त्यांना सध्या मुख्य प्रवाहातून बाहेर केले गेले आहे, असा खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलं.(Gadkari On Side Track) त्या बारामतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाना साधला. (Supriya Sule On Nitin Gadkari)

अजित पवार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट, असे दोन ग्रुप पडले. त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर विविध प्रतिक्रिया आल्या. शरद पवार गटाच्या नेत्यांनी हार न मानता पुन्हा पक्ष उभा करून लढण्याचा विश्वास दर्शवला.

विधानामुळे मोठी खळबळ

दरम्यान शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे काल बारामतीच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी कार्यकर्त्यांशी तसेच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे. त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याबद्दल हे विधान केलं आहे. ‘ नितीन गडकरी चांगलं काम करत आहेत. (Nitin Gadkari Doing Good Work) पण गडकरींना साईडलाइन केलं’ असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ माजली आहे.

ते दुसऱ्या पक्षात असले तरी

बारामतीच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे विविध मुद्यांवर बोलल्या. ‘ नितीन गडकरी चांगल काम करतात. ते भाजपमध्ये आहेत पण आम्हाला प्रेम देतात. ते दुसऱ्या पक्षात असले तरी जे चांगलंय त्याला चांगलं म्हटलं पाहिजे’ असं त्या म्हणाल्या. (Gadkaris Work Specks) एवढंच नव्हे तर ‘गडकरींना साईडलाईन केलं’ असं मोठं विधानही त्यांनी केलं.(Central side Track to Gadkari )

गडकरी संतापले : त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन आत टाका

सांगा मग पास की नापास ?

यावेळी त्या देवेंद्र फडणवीसांबद्दलही बोलल्या. जनता, देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत आहे.(People Ask to Fadnivis For Resign) मला त्यांचं वाईट वाटतं बिचारे १०५ आमदार आले आणि १० मार्क असताना ५ कमी केले आणि डीसीएम (उपमुख्यमंत्री) केलं. परत दोन डीसीएम केले अडीच मार्कवर आणलं. १० पैकी अडीच मार्क सांगा मग पास की नापास ? असा सवाल त्यांनी विचारला. (Devendra Fadnavis Fail Or Pass)

Latest Posts

Don't Miss