Thursday, January 16, 2025

Latest Posts

नवनीत राणा यांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध

| TOR News Network | Navneet Rana Latest News : खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत बहुचर्चित असलेला निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. (Supreme Court Result on rana caste) नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरावर सर्वोच्च शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे.(Navneet rana Caste certificate valid)

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत राणांना मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपकडून आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (SC caste certificate of Amravati MP Navneet Rana) नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. आता त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र बोगल ठरवलं होतं. २०१९ उमेदवारी अर्ज भरताना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप राणा यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. (Supreme Court valid rana’s caste certificate)

नवनीत राणा भाजपच्या कमळावर अमरावतीतून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. (Navneet rana from bjp) त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यांनी आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आज त्या उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत.

२०१९ ला नवनीत राणा अपक्ष खासदार होत्या. आता त्या भाजपच्या उमेदवार आहेत. राणा यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पहिल्यांदा अमरावतीमधून निवडणूक लढवली आणि शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि अडसूळ यांचा पराभव केला.

गेल्या महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. ८ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयाने सांगितले की, ‘मोची’ जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करून मिळवले गेले. अमरावतीच्या खासदाराला २ लाखांचा दंडही ठोठावला होता.

Latest Posts

Don't Miss