Saturday, January 18, 2025

Latest Posts

माझ्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा

| TOR News Network |

Sunil Tatkare Latest News : यंदाच्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार सुनिल तटकरे हे विजयी झाले. रायगड लोकसभा मतदार संघातून तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या अनंत गिते यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. (Sunil Tatkare From Raigadh) या विजयानंतर महायुतीत प्रामाणिक पणे काम झाले की महाविकास आघाडीत काही दगाफटका झाला याची चर्चा सुरू आहे. त्यात आता सुनिल तटकरे यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीतील टेन्शन वाढणार आहे.(Sunil Tatkare on Mahavikas Aghadi) सुनिल तटकरे यांनी आपल्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा असल्याचे वक्तव्य केले आहे.(Sunil Tatkare On Congress) त्यामुळे रायगडमध्ये नक्की कुणी कोणाला मदत केली याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणूकीतील विजयात महायुतीमधील घटक पक्षांबरोबरच कॉंग्रेसनेही आपल्‍याला मदत केल्‍याचा दावा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केलाय.(Sunil Tatkare claimed that congress helped me in election) शिवसेना, भाजप, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसबरोबरच कॉंग्रेसच्‍या काही सहकाऱ्यांनी मदत केली. त्यामुळेच मागील निवडणूकीपेक्षा अधिक मताधिक्‍य मिळाल्याचा दावा सुनिल तटकरे यांनी केला आहे.(Sunil Tatkare Big Claim) अलिबाग विधानसभा मतदार संघातून आपल्याला काँग्रेसची साथ मिळाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळ त्यांचे आभार मानतो असेही ते म्हणाले. अलिबाग विधानसभेतून महाविकास आघाडीच्या अनंत गितेंना आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती. इथे काँग्रेस आणि शेकापमुळे शिवसेना मुसंडी मारेल असे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसला लिड मिळाले.

लोकसभा निवडणूकीत विजय मिळाल्यानंतर सुनिल तटकरे हे अलिबागमध्ये आले होते (Sunil Tatkare Thanks Voters). त्यावेळी त्यांनी इथल्या जनतेचे आभार मानले. मात्र यावेळी काँग्रेस बाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. रायगड लोकसभा मतदार संघातून सुनिल तटकरे यांनी गितेंचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. यावेळी मात्र तटकरेंचे मताधिक्य वाढले होते. त्यांनी जवळपास 80 हजाराच्या फरकाने विजय मिळवला. मागील निवडणुकीत हेच महाधिक्य 30 हजाराच्या आसपास होते. तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. जे लोकसभेला निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या अन्य तीन उमेदवारांच्या पदरी पराभव पडला आहे.

Latest Posts

Don't Miss