Thursday, January 16, 2025

Latest Posts

सुनिल केदार यांचा जेल मध्ये आफ्टर बॅरेक मध्ये मुक्काम

त्यांना गुरुवारी रात्री पोलिसांनी घेतले ताब्यात

Sunil Kedar Jail News : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्यातील आरोपी माजी मंत्री सुनिल केदार यांची गुरुवारच्या रात्री उशीरा जेल मध्ये रवानगी करण्यात आली. (Sunil Kedar Sent To Central Jail Nagpur) त्यांना कोर्टाने आरोपी ठरवल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती.त्यामुळे त्यांना गेल्या २२ डिसेंबरपासून मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्यात आरोपी असलेले माजी आमदार सुनील केदार यांना बुधवारी (ता.२८) रात्री मेडिकलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. चार तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रकृती बरी असल्याचा अहवाल सादर केला.हा अहवाल येताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, त्यांची तडकाफडकी कारागृहात रवानगी केली. गेल्या २२ डिसेंबरपासून त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्याच्या निकाल २२ डिसेंबरला देण्यात आला. निकालात पाच वर्षाची शिक्षा माजी आमदार सुनील केदार यांना ठोठावण्यात आली. याच दिवशी छातीत दुखत असल्याने त्यांना मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान त्यांना मायग्रेनचा त्रास, निमोनियाचे लक्षण आढळून आले होते. ताप वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. याशिवाय किडनीचाही संसर्ग झाल्याने उपचाराचा कालावधी वाढला. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती स्थिरावताच, ते ‘फिट’ असल्याचा अहवाल दिला.

त्यानंतर तडकाफडकी पोलिसांनी मेडिकलमध्ये पाचारण करीत, त्यांची कारागृहात रवानगी केली. यावेळी मेडिकलमध्ये खुद्द पोलिस उपायुक्तांसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

साम्य असणारी बातमी : सुनील केदार रुग्णालयात दाखल

मेडिकलमधून पोलिस ताफ्यात कारागृहात रवानगी केल्यावर माजी आमदार सुनील केदार यांना कारागृहातील ‘आफ्टर बॅरेक’मध्ये इतर कैद्यासोबत ठेवण्यात येणार आहे. पोलिस कस्टडीमधून आणल्यावर सर्वच कैद्यांना ‘आफ्टर बॅरेक’मध्ये ठेवण्यात येते.

Latest Posts

Don't Miss