Monday, November 18, 2024

Latest Posts

रात्री उशीरा आमदार सुनील केदार रुग्णालयात दाखल

तीन दिवस सुट्ट्या असल्याने कारागृहात जाणार असल्याचे चर्चा

Sunil Kedar Latest News: माजी मंत्री सुनील केदार यांना शुक्रवारी (२२ डिसेंबर) पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्यांच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी सूत्रे हलवली. मात्र उशिरा निर्णय आल्यामुळे जामिनावर सुनावणी २६ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा सुनील केदार यांची प्रकृती बिघडली. त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अतिदक्षता विभागात दाखल केले गेले.(Late Night Congress Mla Sunil Kedar admitted in Hospital) दरम्यान शनिवारी केदार यांच्या मेडिकलमध्ये आणखी काही वैद्यकीय तपासणी होणार आहेत. पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी नाताळची सुट्टी असल्याने जामिनासाठी न्यायालयाने २६ डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. यामुळे सुनील केदार यांची निदान काही रात्र तरी कारागृहात जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.

बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बँक घोटाळ्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह पाचजण दोषी आढळले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 12.5 लाखांचा दंड ठोठावला आहे.दरम्यान सुनील केदार यांना रात्री उशिरा आरोग्याबाबत त्रास सुरू झाला. त्यांनी ‘मायग्रेन’मुळे तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आहे. येथे डॉक्टरांनी ‘इसीजी’ काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आतचे, हे तपासले जात आहे. तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.न्यायालयाने केदार यांना शुक्रवारी सकाळी गुण्यात दोषी ठरवले आणि निर्णय सायंकाळी दिला. सायंकाळी निर्णय देतानाही बराच कालावधी लागला. सायंकाळी उशिरा निर्णय आल्यामुळे जामिनाच्या अर्जावर पूर्ण सुनावणी होऊ शकली नाही. पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी नाताळची सुट्टी असल्याने जामिनासाठी न्यायालयाने २६ डिसेंबरची तारीख निश्चित केली आहे. यामुळे सुनील केदार यांची निदान काही रात्र तरी कारागृहात जाणार आहे. दरम्यान शनिवारी केदार यांच्या मेडिकलमध्ये आणखी काही वैद्यकीय तपासणी होणार आहेत. त्यात केदार यांच्या आजाराबाबत ठोस कळणार असल्याने डॉक्टरांनी सांगितले.

 

Latest Posts

Don't Miss