Saturday, January 18, 2025

Latest Posts

पंकजा मुंडेंना हा उमेदवार देणार तगडी टक्कर..गेल्या निवडणुकीत घेतले होते येवढे मत

| TOR News Network | Pankaja Munde Beed Lok Sabha : पंकजा मुंडे यंदा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे उभे राहणार असल्याची दाट शक्यता वर्तावली जात आहे. बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane to join Sharad Pawar group) हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून ज्येष्ठ नेते शरद पवार गटात  गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. सोनवणे हे शरद पवार गटात गेल्यास भाजप नेत्या पंकजा मुंडे गटाला डोकेदुखी ठरणार अशी चर्चा सुरु आहे. (In beed Pankaja munde vs Bajrang sonawane)

बजरंग सोनवणे यांनी भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांचे कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यातील केजमधील बैठकीत केला. बजरंग बाप्पा तुम्ही निवडणूक लढवाच, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त करुन तयारी सुरु केली आहे.

सन 2019 कालावधीमधील लोकसभा निवडणुकीत बजरंग साेनवणे यांनी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली होती. सोनवणे हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत आहेत. बीडची जागा भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याकडे गेल्याने सोनवणे यांनी शरद पवार गटातून निवडणुक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.(Bajrang sonawane from Sharad pawar ncp)

बीड लोकसभा मतदारसंघाची चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्या पुण्यात बैठक बोलावली आहे. यावेळी बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत बजरंग सोनवणे यांनी प्रवेश केला तर अजित पवारांना मोठा धक्का बसू शकतो. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाची डोकेदुखी वाढू शकते अशी चर्चा आहे.

सन 2019 च्या निवडणुकीचा असा होता निकाल

प्रीतम मुंडे – 6 लाख 78 हजार 175 मते.

बजरंग सोनवणे – 5 लाख 9 हजार 807 मते.

1 लाख 68 हजार 368 मताच्या फरकाने प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या.

Latest Posts

Don't Miss