Monday, January 13, 2025

Latest Posts

न खेळताच आऊट झाला Angelo Mathews

अशा प्रकारे बाद होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला

Angelo Mathews Latest News: श्रीलंका विरुद्ध बांगलादेशच्या  विश्वचषकातील  सामन्यात आज एक अजब प्रकार बघायला मिळाता. मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूला फलंदाजी करण्यापूर्वीच आऊट देण्यात आले. (Angelo Mathews is first cricketer to be Timed out) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात अशा प्रकारे आऊट होणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला.

नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बांगलादेश विरुद्धचा सामना सुरु आहे.यात बांगलादेशच्या शाकिबने ४२ चेंडूंत ४१ धावा करणाऱ्या सदीरा समरविक्रमाला बाद केले.त्यानंतर मॅथ्यूज फलंदाजीला आला.विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, येणार्‍या फलंदाजाने, वेळत मैदानावर पोहचून २ मिनीटाच्या आत चेंडू घेण्यास तयार असणे आवश्यक आहे.मात्र मॅथ्यूज फलंदाजीसाठी येत असताना त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटलेला दिसून आला. तो हेल्मेट बदलीची वाट पाहत असतानाच शाकिबने २ मिनिट होऊन देखील फलंदाज तयार नसल्याच्या नियमावर बोट ठेवत अपील केले.त्यामुळे अंपायरने मॅथ्यूजला आऊट दिले.अशा प्रकारे बाद होणारा श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यू हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.

Latest Posts

Don't Miss