Friday, January 17, 2025

Latest Posts

तर आम्ही महायुतीच्या नवीन सरकारमध्ये नसू – नवाब मलिक

| TOR News Network |

Nawab Malik Latest News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ पाच दिवस उरले आहेत. प्रचाराला जोर आला आहे. अशात आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटोंगे तो कटोंगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला.(Modi,yogi slogan) त्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले. अशातच महायुतीमधील अजितदादा गट या घोषणेवर नाराज आहे. अजितदादांनी महाराष्ट्रात अशा घोषणांची गरज नसल्याचे फटकारले. (Ajit pawar Group displeased on mahayuti) तर आता त्यांच्या जवळच्या एका शिलेदाराने भाजपाने वादग्रस्त मुद्यावर राजकारण सोडले नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचा इशारा दिला आहे.

भाजपाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात वाशीम येथील जाहीर सभेत बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती. भाजपाने निवडणुकीत हिंदूत्व कार्ड खेळल्याचे मानले जात होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच प्रचार सभेत एक है तो सेफ है असा नारा दिला. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. महाविकास आघाडीने या दोन्ही नाऱ्यावर सडकून टीका केली.(Mahavikas aghadi on Bjp slogan)

तर दुसरीकडे महायुतीच या घोषणेवरून ठिणगी पडली. अजितदादांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.(Ajit Pawar on bjp slogan) महाराष्ट्र हा शाहु-फुले-आंबेडकरांचा आहे. येथे शिवरायांची शिकवण आहे. साधु-संतांची पंरपरा आहे. राज्यात अशा वक्तव्याला थारा नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी पण असेच वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी त्यावर खुलासा दिला. तर आता अजितदादांच्या शिलेदाराने थेट काडीमोड घेण्याचा इशारा दिला आहे.

मानाखूर्द-शिवाजीनगर या मतदारसंघात महायुतीतच टफ फाईट आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे नवाब मलिक या मतदारसंघातून मैदानात उतरले आहे. नवाब मलिक यांनी बटोंगे तो कटोंगे या नाऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. (Nawab malik on Bjp slogan) भाजपाने वादग्रस्त मुद्दावर राजकारण थांबवलं नाही तर आम्ही महायुतीच्या नवीन सरकारमध्ये नसू असा थेट इशाराच त्यांनी दिला.(Nawab malik warns bjp) त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मुद्यांवर रोखठोक विचार मांडले.

Latest Posts

Don't Miss