Thursday, January 16, 2025

Latest Posts

श्रीनिवास पाटीलांची माघार : सातारा लोकसभेतून कोण 

| TOR News Network | Satara Lok Sabha Consituency : साता-याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार नसल्याची चर्चा आज (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. प्रकृतीच्या कारणामुळे खासदार श्रीनिवास पाटील हे निवडणुक लढविणार नाहीत असे त्यांनी खूद्द ज्येष्ठ नेते शरद पवार  यांना देखील सांगितल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोलताना नमूद केले. (Mp shrinivas patil quit from Lok Sabha)

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार निवडण्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे आज (शुक्रवार) सातारा (Sharad pawar in satara) दौऱ्यावर आले आहेत. ते सुमारे 200 कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करीत आहेत.

दरम्यान विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे नेत्यांनी इतर नावांचा विचार करावा असं स्वतः पाटील यांनी पवार यांना सांगितल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले. बहुतांश कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी स्वतः निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे.

Latest Posts

Don't Miss