Saturday, January 11, 2025

Latest Posts

अखेर श्रीकांत शिंदेंना कल्याण मधुन उमेदवारी

| TOR News Network | Kalyan Constituency : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये कल्याणची जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटाच्या दोन याद्या जाहीर झाल्या होत्या मात्र यात कल्याणचे नाव नव्हते त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं.अपल्या मुलाला देखील तिकीट देता येत नाही अशी परिस्थिती महायुतीत आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती.मात्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणच्या जागे बाबत घोषणा केली.(Devendra Fadnavis On Shrikant Shinde)

कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.(Devendra Fadnavis on kalyan lok sabha) गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये कल्याणची जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटाच्या दोन याद्या जाहीर झाल्या होत्या मात्र यात कल्याणचे नाव नव्हते त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता देवेंद्र फडणवीसांनी स्वत: आम्ही श्रीकांत शिंदेंना निवडून आणणार असं मोठं वक्तव्य केलं आहे. (Fadnavis says Srikanth Shinde will win)

सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, औरंगाबाद, पालघर, कल्याण, नाशिक आणि ठाणे या काही जागांबाबत महायुतीमध्ये तिढा आहे. अशात आता हा तिढा लवकरच पूर्णत:सुटणार अशी चिन्हे दिसत आहे. ठाण्यासह कल्याण आम्हालाच हवे, असा मुख्यमंत्री शिंदेंचा आग्रह आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीसांनी स्वत: कल्याणसाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली आहे.(Fadnavis announced kalyan seat to shrikant shinde)

Latest Posts

Don't Miss