Sunday, January 12, 2025

Latest Posts

काँग्रेसला धक्क : ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर

| TOR News Network |

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या आधी सुद्धा मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग होण्यास सुरुवात झाली आहे. (incoming-outgoing Before Vidhansabha) नुकतेच पिंपरी चिंचवड येथील अजित पवार गटाचे काही नेते शरद पवार गटात गेलेत. त्यात आता भाजप काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत आहे.(Bjp Ready to Shock Congress) काँग्रेसचा एक आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.(Congress Mla to join Bjp) गुरुपोर्णिमेच्या निमित्ताने या काँग्रेस आमदाराने भाजपा नेते, खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली.(Congress Mla Meet Ashok Chavhan) त्या पूर्वी त्यांनी भाजप नेते उपाध्याय यांचीही भेट घेतली होती.

पुढील दोन ते तीन  महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती.(Mahavikas Aghadi big Success in loksabha) राज्यात 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाड़ीचे उमेदवार विजयी झाले होते. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानाव लागलं होतं.(Bjp only Won 17 Seats) लोकसभा निवडणुकीचा निकाल महायुतीसाठी एक इशारा आहे. महायुतीने विधानसभेची तयारी करताना काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हा याच रणनितीचा एक भाग आहे. त्याशिवाय अनेक कल्याणकारी योजनांचा धडका लावला आहे.

विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर भाजपात प्रवेश करु शकतात. (Jitesh Antapurkar to Join BJP Soon) भाजप नेते उपाध्याय यांच्या भेटीनंतर आमदार अंतापुरकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. (Congress Mla Jitesh Antapurkar Meet Ashok Chavan) काल गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. आमदार अंतापुरकर भाजपात प्रवेश करणार असल्याची नांदेड जिल्ह्यात चर्चा आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात येतो. नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो.

लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेससोडून भाजपामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपाला फायदा झाला नाही. (No Profit to Bjp by Ashok Chavhan) उलट फटका बसला. भाजपाच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण निवडून आले. ऐन निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांनी केलेलं हे पक्षांतर नांदेडच्या मतदारांना पटलं नाही. त्यांनी तसा कौलही दिला. आमदार जितेश अंतापुरकर यांनी 2021 च्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत 1 लाखापेक्षा जास्त मत मिळवली. त्यांनी भाजपाच्या सुभाष साबणे यांचा 41 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

Latest Posts

Don't Miss