| TOR News Network |
Ashokrao chavan Latest News : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समीकरणामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे काही नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशात आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर हे आज स्वगृही परतणार आहेत. (Ashok Chavan;s brothet in law to Left Bjp) काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. (Bhaskarrao Patil Khatgaonkar to join Congress)
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे देखील भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र, आता भास्करराव खतगावकर हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे अशोक चव्हाणांना हा मोठा धक्का मानला जात आहे.(Big shock to ashokrao chavan)
आज नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. मीनाताई खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे यांच्यासह अनेक नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य शुक्रवारी टिळक भवन दादर येथे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँगेस प्रवेशाची घोषणा केली होती. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर (Meenal Khatgaonkar) यांना नायगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे खतगावकर यांनी जाहीर केले होते. यासंदर्भात अशोक चव्हाण यांना विचारले असता खतगावकर आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील मी इतकं सांगू शकतो, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. (Ashok Chavan on bhaskarrao khatgaonkar)