Thursday, January 16, 2025

Latest Posts

शिवसेनेत खळबळ : उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के

माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

| TOR News Network | Shiv Sena UBT News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गळती सुरु असून एकापाठोपाठ धक्क्यावर धक्के बसत आहे. (Big Shock To Shivsena UBT) उद्धव ठाकरे गटाचे उपनेते राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.ते आता एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश करणार आसत्याची माहिती समोर आली आहे. (Babanrao Gholap Left Shivsena Ubt)

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पक्ष बदलीचे वारे वाहत आहेत.याचा सर्वधिक फटका राष्ट्रवादी,काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला बसत आहे.अशात आता बबनराव घोलप यांनी देखील शिवसेना सोडली आहे. घोलप हे नाराज असल्याची चर्चा होती.काही  दिवसांपूर्वी ठाकरे गटाने त्यांच्याकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद काढून घेतले होते.

यानंतर घोलप यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा देखील दिला होता. यानंतर बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेटही घेतली होती. मात्र, या भेटीत त्यांचे समाधान झाले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं.

तेव्हापासून बबनराव घोलप हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होत्या. विशेष बाब म्हणजे, गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालादेखील घोलप उपस्थित नव्हते. (Latest Marathi News)

उद्धवजी……गेट वेल सून 

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. अखेर गुरुवारी (१५ फेब्रुवारी) बबनराव घोलप यांनी शिवसैनिकपदाचा राजीनामा दिला आहे.

बबनराव घोलप यांचा परिचय

बबनराव घोलप नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून पाचवेळा आमदार राहिलेले आहेत. ते १९९५ च्या युती सरकारच्या काळात मंत्री होते. त्यांनी नाशिक जिल्ह्यात ३० वर्षे एकहाती वर्चस्व ठेवत शिवसेनेला ताकद दिली. शिवसेना फुटल्यानंतरही त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले होते.

आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून आपल्या लेकीला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा घोलप यांची होती. मात्र, ऐनवेळी ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश दिल्याने घोलप नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

Latest Posts

Don't Miss