Thursday, January 16, 2025

Latest Posts

शोएब मलिकने सानिया मिर्झाला सोडले

Sania Mirza Shoaib Malik Divorce : शोएब मलिक आणि सानिया मिर्झा एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. शोएब मलिकने आपल्या तिसऱ्या निकाहाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच यावर शिक्कामोर्तब झालं. तुम्ही वर वाचलं ते अगदी बरोबर आहे. शोएब मलिक याचा हा तिसरा निकाह आहे. सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी त्याने हैदराबादमधील शिक्षकेसोबत संसार थाटला होता.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांची वाट वेगवेगळी झाली आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. सना आणि शोएब गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.शोएब मलिकचा हा तिसरा निकाह आहे. सानिया मिर्झाशी लग्नगाठ बांधण्यापूर्वी त्याचा निकाह झाला होता. अनेकांना याबाबतची माहिती नव्हती. पण आता पहिली पत्नी कोण होती? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

शोएब मलिकने 2002 मध्ये आयशा सिद्दीकीसोबत लग्न केले होते. मात्र काही वर्षांनंतर तलाक घेत हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर शोएबने भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झाशी दुसरे लग्न केले. आयेशा सिद्दीकी व्यवसायाने शिक्षिका आणि भारतातील हैदराबाद शहरातील रहिवासी होती.

शोएब मलिकच्या सानिया मिर्झाशी लग्नादरम्यान आयशाने गंभीर आरोप केला होता. शोएब मलिक तलाक न देता लग्न करणार असल्याचं सांगतलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, आयशाने शोएबविरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला होता.आयशाने शोएब आणि त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ पोलिसांना पुरावा म्हणून दाखवला होता. तसेच आयशाने शोएब मलिकला तलाक देणार असल्याचे सांगितले होते. पोटगी म्हणून शोएबने आयशाला 15 कोटी रुपये दिल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर सानियाशी लग्न केले होते. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, या दोघांचा 4 महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला आहे. शोएब आणि सानिया 12 वर्षांपासून एकत्र होते. त्यांना एक मुलगाही आहे.

Latest Posts

Don't Miss