Saturday, January 11, 2025

Latest Posts

36 तासांपासून बेपत्ता असलेले आमदार परतले

| TOR News Network |

Shrinivas Vanga Latest News : महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाले होते. ते नॉट रिचेबल झाले होते. (Mla Vanga Not reachable) पण आता अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. (vanga came back after 36 hours) मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. सध्या श्रीनिवास वनगा हे बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती त्यांची पत्नी सुमन यांनी केली आहे.

श्रीनिवास वनगा हे गायब झाल्यापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. यानंतर काल मध्यरात्री तीनच्या सुमारास श्रीनिवास वनगा हे घरी परतले. त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा केली. यानंतर ते पुन्हा नातेवाईकांकडे निघून गेले. यावेळी श्रीनिवास वनगा यांनी घरी परतल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे सांगितले.

श्रीनिवास वनगा हे सोमवारी रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. गेल्या 36 तासांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. तिकीट नाकारल्याने नाराज होऊन मागील 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांची संपर्क झाला आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

Latest Posts

Don't Miss