Sunday, January 12, 2025

Latest Posts

राज्यात नामर्दांचं सरकार – Sanjay Raut

आपले सुलतान आणि डेप्युटी सुलतान प्रचारात व्यस्त

Sanjay Raut Latest Controversy Statement : शिवसेना नेते दत्ता दळवी यांच्या अटकेवरुन सत्ताधारी शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगत आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यात नामर्दांचं सरकार चालू आहे, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हणटंले आहे. त्या शिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुलतान आणि डेप्युटी सुलतान असॆ संबोधले आहे.

शिवसेना नेते दत्ता दळवींना मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दोन्ही गटात राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यांमध्ये प्रचारात व्यग्र असल्याची टीका राऊतांनी केली आहे. अवकाळीचं संकट आस्मानातून कोसळत असताना आपले सुलतान आणि डेप्युटी सुलतान प्रचारात व्यस्त होते. कुणी छत्तीसगडमध्ये, कुणी तेलंगणात होते. जणूकाही ते गेले नसते तर तिथे निवडणुका थांबल्या असत्या. त्यांची मुख्य जबाबदारी होती इथून खोके नेऊन तिथल्या लोकांना सुपूर्त करायची. पण आपली ११ कोटी जनता संकटात असताना त्याबाबतीत त्यांना चिंता नाही, असं राऊत म्हणाले. सध्या राज्यात नौटंकी सुरु आहे. ज्यांचा राजाच नौटंकी आहे, त्यांचे सरदार नौटंकी असणारच. विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षांचे नेते दोन दिवसांपासून गावागावात जाऊन फिरत आहेत. पण मुख्यमंत्री व त्यांचे सरकार आज जागे झाले आहे असंही ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss