Saturday, January 11, 2025

Latest Posts

शिवसेनेच्या पक्ष व चिन्हा संदर्भातील सुनावणी पुढे ढकलली

Theonlinereporter.com – May 16, 2024 

Supreme Court Shiv Sena Symbol News : सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा शिवसेनेचे चिन्ह व पक्ष कोणाचा यावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. (Shiv Sena hearing postponed) सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड सध्या ब्राझील दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता थेट जुलैमध्ये होणार आहे. (Shiv Sena Party hearing In july)

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबद्दल १७ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्णय दिला. पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना बहाल करण्यात आलं.(Shivsena symbol to shinde) त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. (Big Shock to uddhav thackeray) त्यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ठाकरेंच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आलं. तर उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह देण्यात आलं.(Mashaal symbol given to uddhav thackeray) याच चिन्हाच्या आधारे ठाकरेसेना लोकसभेची निवडणूक लढवत आहे. शिवसेना पक्ष, चिन्हाबद्दलची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे. पाचवेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss