Sunday, January 12, 2025

Latest Posts

शिंदे यांचा पक्ष दोनचार महिन्यांपुरता

| TOR News Network | Ambadas Danve Latest News : एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन चार महिन्यांपुरता उरलाय. (Eknath Shinde’s party is only for two to four months) विधासभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील असा दावा करत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. (Shivsena ambadas danve on shinde shivsena) लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवरच आलेल्या असताना महायुतीमधील जागा वाटप तिढा, धुसफूस पूर्णपणे थांबलेली नाही.(Mahayuti seats in trouble) भाजपने अनेक जागांवर त्यांचेच उमेदवार जाहीर करून शिंदे गट आणि अजित पवार गटाची गोची केली आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरुन आता शिंदेंच्या शिवसेनेतच भाजप संदर्भात नाराजी सुरु झाल्याची माहिती आहे. (Bjp Pressure on shivsena)

शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वत:कडे खेचल्यानं नाराजी असल्याची चर्चा आहे. निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे करत जागा स्वत:कडे घेतल्याची शिंदे गटातून तक्रारी आल्या होत्या. (Negative survey of shivsena )काही मतदारसंघ भाजपकडे गेल्यानं शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष काही महिन्यांचाच सोबतीचा असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली. विधानसभे पर्यंत हा पक्ष राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. (Shivsena party will come to end before vidhansabha) भाजपच्या तालावरच शिंदे गटाला नाचावं लागतंय असेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुनावले.

यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आणि हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावरूनही दानवेंनी खडे बोल सुनावलेत. भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आणि जे पवार आहेत यांना ताटाखालचं मांजर बनवून ठेवलं आहे, अशी घणाघाती टीका दानवेंनी केली. यांच्या बोलण्याला काही महत्व नाही, भारतीय जनता पार्टी जे म्हणेल तेच त्यांना करावं लागतं. शिवसेनाप्रमुख आणि उद्धवजी हे ज्यावेळी नेतृत्व करत होते त्यावेळेस कधी भारतीय जनता पार्टीची हिंमत झाली नाही की तुमचा उमेदवार हा असावा असं बोलण्याची. जागावाटप हे पक्षाचे होत असते, त्यांनी त्यांचा त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते, परंतु हे नवीनच होत आहे, असेही ते म्हणाले. .

महायुतीवर उमेदवार बदलण्याची वेळ

महायुतीला यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये उमेदवार बदलावा लागला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्याही काही जागा अजून फायनल झालेल्या नाहीत, याकडे कसं पाहता, असा प्रश्न दानवे यांना विचारण्यात आला. शिवसेनेच्या जवळपास सर्व जागा फायनल झाल्या आहेत. २१ उमेदवार पूर्णपणे जाहीर झालेले आहेत. मुंबईतील काही विषय बाकी आहेत. काँग्रेस लढणार नसेल तर शिवसेना या जागा लढवणार अशा प्रकारची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.

महायुतीत अजून घोळच चालू

राहता राहिला महायुतीचा प्रश्न तर त्यांचाच अजून घोळ सुरू आहे. त्यांचा उमेदवार बदलणं चालू आहे, याला जागा द्यायची का त्याला हेच अजून त्यांचं सुरू आहे. महायुती आहे की महाबेकी आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. खरंतर तिकडेच बेकी आहे, आमच्याकडे सगळी एकी आहे असे सांगत अंबादास दानवेंनी महायुतीला टोला लगावला.

भाजपमध्ये मोदी आणि शाहांशिवाय कोणाचंच चालत नाही

विचारवंतांचा विचार फक्त नरेंद्र मोदींनी केलाय, नाटकबाजांचा विचार कुणी करत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यालाही दानवेंनी चोख प्रत्युत्तर दिलं. ‘ मोदींकडे फार विचारवंत जमा झालेत’ उपरोधिक स्वरात उत्तर दिलं. मोदींकडे (असताना) विचार करायला काही संधी आहे का, यांना तरी कुणी विचारतं का ? असा खोचक सवालही दानवेंनी विचारला.मोदींकडे फक्त मोदी आणि अमित शाह यांचा विचार चालतो, बाकी कोणाचाही विचार चालत नाही अशा शब्दांत दानवे यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेंना टोला लगावला. गरिबी हटवण्यासाठी फक्त मोठमोठ्या घोषणा देतात बाकी काही नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Latest Posts

Don't Miss