Friday, January 17, 2025

Latest Posts

शिंदे,फडणवीस, अजित पवारांचा अचानक दिल्ली दौरा

| TOR News Network |

CM-DCM Latest News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती अॅक्शन मोडवर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार शनिवारी  (27 जुलै) दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Shinde,Fadnavis,Ajit PAwar going delhi) महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते.(Mahayuti delhi meeting) तसेच जागा वाटपाचे फॉर्म्युला निश्चित होऊ शकते, असे सांगितले जात आहे.(Mahayuti formula for vidhansabha)

लोकसभेतील पराभवानंतर महायुतीने आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.(Mahayuti in action For Vidhansabha) येत्या महिनाभरात विधानसभा निवडणुकांची घोषणा केव्हाही  होऊ शकते. त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्यला निश्चित करून महायुतीने निवडणुकीच्या कामाला लागण्याची तयारी सुरू केली आहे.

विधासनभेसाठी  शिंदे गटाने 100 तर अजित पवार गटाने 80 जागांची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.(Shinde 100 pawar 80 seats demands) तर, स्थानिक भाजप नेते 150 पेक्षा कमी जागांवर लढू नये, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. (Bjp to contest 150 seats in vidhansabha)त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट असू शकते. दिल्लीतच हा जागावाटपाचा  फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.(Ajit Pawar meet amit shah on Seat Sharing) त्यानंतर अगदी दोन दिवसातच देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अजित पवार पुन्हा दिल्लीत जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार उशीरा घोषित झाल्यामुळे महायुतीला पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यात समन्वयाचा अभाव अशा काही कारणांमुळे महायुतीला लोकसभेत अपयश आले, असा निष्कर्ष काढण्यात आला. पण विधानसभेला अशी चूक होऊ नये म्हणून आता महायुतीच्या नेते जागावाटपासाठी महत्त्वाची पावले उचलत असल्याचे दिसत आहे.

Latest Posts

Don't Miss