Saturday, January 11, 2025

Latest Posts

शाहरुखने दिला टीम इंडियाला धीर: Shahrukh Khan Tweet On Team India

Shah Rukh Khan Reaction on Team India Losses Cricket World Cup 2023: रविवारी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया पराभूत झाला.विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग 10 दहा सामने जिंकले होते. मात्र अकराव्या अंतिम सामन्यात मुरब्बी ऑस्ट्रेलियाने मोक्याच्या क्षणी बाजू उलटवली. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकावर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं.अशात पराभूत झाल्याने भारतीय संघाला बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने ट्विट करत धीर दिला.

 या पराभवानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्कालाही अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ती भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने ट्विट करत टीम इंडियाला धीर दिला. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एकाही फलंदाजाला म्हणावी अशी छाप पाडता आली नाही. रोहित शर्मा अर्धशतकाच्या समीप पोहोचून मोक्याच्या क्षणी बाद झाला. विक्रमवीर विराट कोहली अर्धशतक झळकावून लगेचच बाद झाला. तर के. एल. राहुलचं अर्धशतक सावकाश गतीमुळे संघासाठी कुचकामी ठरलं. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे इतर फलंदाजसुद्धा अपयशी ठरले. टीम इंडिया संपूर्ण टूर्नामेंटमध्ये ज्याप्रकारे खेळली ती सन्मानाची बाब आहे. त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि त्यात एखाद-दुसरा वाईट दिवस असतोच. दुर्दैवाने ते आज घडलं. परंतु क्रिकेटमधील आपल्या खेळाचा वारसा ज्या पद्धतीने टीम इंडियाने पुढे नेला, ते पाहून मला त्यांचा फार अभिमान वाटतो. यासाठी मी टीम इंडियाचे आभार मानतो. तुम्ही संपूर्ण भारताला खूप आनंद दिला. तुम्ही आम्हाला एक अभिमानी राष्ट्र बनवलात अशा शब्दांत शाहरुखने टीम इंडियाचं कौतुक केलं. शाहरुख त्याच्या कुटुंबीयांसोबत वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी, मॅनेजर पूजा ददलानी, मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान उपस्थित होते. याशिवाय बॉलिवूडमधील इतरही बरेच सेलिब्रिटी टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले होते. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, आयुषमान खुराना, शनाया कपूर यांसारखे सेलिब्रिटी स्टेडियमवर उपस्थित होते.

 

 

 

Latest Posts

Don't Miss