Thursday, January 16, 2025

Latest Posts

परळीत शरद पवार मराठा कार्ड खेळणार ; धनंजय मुंडे विरोधात राजसाहेब देशमुख मैदानात उतरणार

| TOR News Network |

Sharad Pawar Latest News : राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुका बघता महाविकास आघाडी व महायुतीने कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी, सभा, दौरे यांना वेग आला आहे. अशातच परळी या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार मराठा कार्ड खेळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.(Sharad Pawar to play Maratha Card From Parali) बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर भेट घेतली आहे. (Rajsaheb Deshmukh Meet Sharad Pawar) राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

राजेसाहेब देशमुख परळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आगामी काळामध्ये राजेसाहेब देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे.(Congress Leader to Join Sharad Pawar NCP) अशातच बीड परळी या भागात मराठा समाज बांधवांनी आरक्षणाचा लढा उभा केला. राज्यात मराठा आरक्षणाचा बीड, जालना हा भाग केंद्रबिंदु ठरला होता. त्याचबरोबर राज्यात असलेल्या सरकारच्या आरक्षणाच्या भूमिका आणि मराठा समाजाची आरक्षणाची मागणी यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

अशातच मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याबाबत काही निर्णय घेतला तर काही समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे. अशातच परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख यांना संधी दिली जाण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.(Rajsahabe Deshmukh Vs Dhananjat Munde) अशातच शरद पवार आणि राजेसाहेब देशमुख यांच्या भेटीमुळे अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर काही दिवसांपुर्वीत दावा केला होता, मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. (Parali District Congress President Rajsaheb Deshmukh) याच अनुषंगाने मतदारसंघात बैठका घेत ते जनतेशी संवाद साधत आहेत. तर राजेसाहेब देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे राष्ट्रीय प्रवक्ते धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत. महायुती सरकारमध्ये आता त्यांच्याकडे कृषीमंत्री देण्यात आलं आहेत. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महायुतीकडून धनंजय मुंडेंनाच परळीतून उमेदवारी देण्यात येईत याबाबत कसलीच शंका नाही. मात्र, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे आता नेमकी संधी कोणाला मिळणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

महायुतीकडून धनंजय मुंडे फिक्स असतील मात्र,  महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळणार का राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाला) हे अद्याप कोणताही स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून लढण्यास अनेक जण इच्छुक आहेत. फुलचंद कराड देखील इच्छुक आहेत. तर रासपाचे युवा माजी प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी पक्ष प्रवेश करून मविआकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Latest Posts

Don't Miss