Sunday, January 12, 2025

Latest Posts

माजी मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत उतरविण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न 

| TOR News Network | Sharad Pawar Statement on Satara Seat : सातारा मतदारसंघात (Satara Lok Sabha Constituency) उमेदवार कोण असावा, याबद्दल चर्चा सुरू आहे. ही जागा सध्या राष्ट्रवादी कडे आहे. पण या मतदारसंघातून काँग्रेसने (Congress) निवडणूक लढवावी, यासाठी राष्ट्रवादीकडून अद्यापपर्यंत प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास विचार करू, असे असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सातारा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले. (Prithviraj Chavan to Contest From satara)

सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच श्री. चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. (Prithviraj Chavan Loksabha news) हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असून, त्यांनी तुतारीबाबत निर्णय घ्यावा. काँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.(If proposal comes will decide)

कऱ्हाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Sharad Pawar, Jayant Patil) यांनी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केली होती. (Close door discussion) त्यानंतर चर्चेला उधाण येऊन साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा खासदार शरद पवार यांचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. (Sharad Pawar intrested for Prithviraj Chavan)

हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा

यावर साताऱ्यातील काँग्रेस भवनात श्री. चव्हाण यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. महाविकास आघाडीच्या ४८ पैकी जवळ जवळ सर्व जागांवर एकमत झालं आहे. सातारा मतदारसंघात उमेदवार कोण असावा, याबद्दल चर्चा सुरू आहे.(Candidate not decided for satara) मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. यासंदर्भात माझी जयंत पाटील यांच्याबरोबर काल चर्चा झाली आहे. आता कोणता उमेदवार द्यायचा? हा निर्णय सर्वस्वी शरद पवार यांनी घ्यायचा आहे. ते जो उमेदवार देतील त्यांचे आम्ही पूर्ण ताकदीने काम करू.

शरद पवार आता काय निर्णय घेणार

उमेदवारीबाबत शरद पवार यांनी निर्णय घ्यायचा आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केले आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा असून, याच पक्षाचा उमेदवार असेल, असे शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. शिवाय महाविकास आघाडीने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच सोडला असल्याने शरद पवार आता काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते, असे विचारले असता श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. उमेदवारीच्या जर तरच्या प्रश्नावर मी बोलणार नाही.

Latest Posts

Don't Miss