Saturday, January 18, 2025

Latest Posts

शरद पवार म्हणाले ते गणित मला अजून कळालेले नाही

Sharad Pawar Speech In Shirdi : लोकसभेच्या निवडणुका समोर आहेत. प्रत्येक पक्ष जागा वाटपा संदर्भात बैठका घेत आहेत.अशात पंतप्रधान मोदी यांनी अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. मात्र अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही.त्यामुळे ते 400 पार कसे जातील. ते गणित मला अजून कळालेले नाही. (I Cant understand the calculation of 400 par says pawar ) तसेच संघ आणि भाजपचा पाच कलमी कार्यक्रम वाचून दाखवत भाजपपासून सावध राहण्याचे आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचं कार्यकर्ता शिबीर शिर्डीत पार पडलं. (Sharad Pawar on Modi Sarkar News Today) यावेळी शरद पवार यांनी हा हल्ला चढवला.

पुढे ते म्हणाले देशातील लहान घटकांना मदत न करण्याची भाजपची भूमिका आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांना मानतो. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्या मनात शाहू, फुले, आंबेडकर नाहीत. तर गाय, गोमूत्र ही त्यांची भूमिका आहे. आरएसएसची विचारधारा आणि त्यांचे कार्यक्रम यालाच महत्त्व दिलं जात आहे. कारण त्यांना हिंदुत्वावर आधारीत फॅसिझम आणण्याचा आहे. त्यासाठी त्यांनी पाच कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे, असं शरद पवार म्हणाले.

पवारांनी सांगितलेला भाजपचा पाच कलमी कार्यक्रम

सर्व क्षेत्रात खासगीकरण, अनिर्बंध नफेखोरीला प्रोत्साहन,खोट्या प्रचारातून मुस्लिम समाजाबाबत द्वेष वाढवणं, धार्मिक द्वेष निर्माण करणं, न्याय व्यवस्था, ईडी, सीबीआय, प्रसारमध्यमं, रिझर्व्ह बँक अशा स्वायसत्ता ताब्यात ठेवणं. मनुवादी वर्चस्ववाद वाढवणं, धर्माच्या नावाखाली देशाला मध्ययुगीन कालखंडाकडे नेणं.आक्रमक राष्ट्रवाद मांडणं. त्यात प्रामुख्याने पाकिस्तानविरोधी आक्रमकता दाखवायची आणि जनतेमध्ये वातावरण निर्माण करायचं… हे फॅसिझमला उत्तेजन देण्याचं काम सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss