महायुतीत येणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Sharad Pawar Bacchu Kadu Latest News : आमदार बच्चू कडू यांची सध्याची राजकीय भूमिका सहजासहजी लक्षात येत नाही. ते नेमके महायुतीसोबत आहेत की, महाविकास आघाडी सोबत आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अमरावतीत आहेत. शरद पवार यांनी गुरुवारी (ता.28) सकाळी बच्चू कडू यांच्या घरी भेट दिली आणि बंद द्वार चर्चा केली. (Sharad Pawar Meets Bacchu kadu in Amravti at his home) त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधान आले आहे.
शरद पवार सध्या दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत.त्यांना बच्चू कडू यांनी घरी येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. त्यानुसार, शरद पवार आज बच्चू कडू यांच्या निवासस्थानी आले.बच्चू कडू अचलपूरचे आमदार आहेत. त्यांनी चांदूरबाजारमध्ये शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू महाविकास आघाडीत प्रवेश करणार का? ही चर्चा जोरात सुरु आहे.अशात आज शरद पवार यांनी बच्चू कडू यांच्या घरी भेट दिल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान “मदतीची जाणीव म्हणून त्यांना आम्ही भेटीला बोलावल. अचलपूरमधील फिनले मिल मध्ये त्यांचं मोठं योगदान आहे” असं बच्चू कडू म्हणाले. “आमचा राजकीय पक्ष आहे. आम्ही काही समाजसेवी संस्था नाही. आमची जर राजकीय मजबूती वाटत असेल तर कुठला पक्ष नाकारणार आहे?” असं बच्चू कडू म्हणाले. “जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत आम्ही सोबत आहोत, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ” असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
कुठल्या आघाडीसोबत जाणार? बच्चू कडू म्हणाले…
“आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती सारखीच आहे. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत मुद्यासोबत गेलो. दिव्यांग मंत्रालय दिले म्हणून आम्ही एकनाथ शिंदे सोबत आहे. आमचे मुद्दे जर घेतले तर आम्ही महाविकास आघाडी सोबत जाऊ” असं बच्चू कडू म्हणाले. “आमचा प्रस्ताव महाविकास आघाडी आणि महायुतीला देखील देऊ. ज्यांनी आमची हे मुद्दे प्रामुख्याने घेतले आम्ही त्यांच्यासोबत जाऊ” असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.