Thursday, January 16, 2025

Latest Posts

अजित पवारसह गेलेल्यांसाठी पक्षाचे दरवाजे बंद – शरद पवार

Sharad Pawar Latest Statement For Ajit Pawar : २ जुलै २०२३  हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचा होता असं म्हणता येईल. कारण याच दिवशी अजित पवार त्यांच्या पक्षातल्या बहुतांश आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. याच दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. त्यानंतर आता एक चर्चा सुरु झाली आहे की अजित पवार गटात घालमेल आहे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार कुंपणावर आहेत असा एक उल्लेख केला होता. आज शरद पवार यांना या विषयी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपलं म्हणणं मांडलं आहे.

मोरारजी देसाई हे वयाच्या ८३ व्या वर्षी पंतप्रधान झाले होते

अजित पवारांनी काय बोलायचं मी त्यावर बोलणार नाही. वयाचा उल्लेख वगैरे करणं त्यांना करायचं आहे तर ते करु शकतात. मी १९५९ मध्ये राजकीय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंत सुट्टी न घेता काम करतो आहे. माझ्या कार्यशैलीवर आणि कार्यपद्धतीवर कधी विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केला नाही. वयाचा प्रश्न जे उपस्थित करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की मोरारजी देसाई हे वयाच्या ८३ व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. त्यांच्यामागे लोकांचं बहुमत होतं. त्यामुळे अशा गोष्टी काढल्या पाहिजेत अशी आवश्यकता वाटत नाही.

त्यानंतर मी राज्यसभेची निवडणूकही लढवणार नाही

माझं वय कोणी का दाखवतंय त्याच्या खोलात मी जात नाही. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना हे ठाऊक आहे की राज्यसभेचा माझा कार्यकाळ अडीच वर्षांनी संपतोय. त्यानंतर मी राज्यसभेची निवडणूकही लढवणार नाही. त्यावरुन माझी दिशा स्पष्ट आहे. तसंच मुद्दा असा आहे की मी जे जाहीर केलंय त्यानंतर तो विषय पुन्हा पुन्हा का काढायचा? लोकांनी मला निवडणून दिलं आहे. माझा संसदेतला कार्यकाळ संपलेला नाही तर मी राजीनामा कसा काय द्यायचा? ही टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं आहे तो कार्यकाळ पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे असंही शरद पवार म्हणाले आहेत.

आमच्या पक्षात फेरविचार होणार नाही

अजित पवार गटात घालमेल सुरु आहेत काही आमदार परत आले तर तुम्ही त्यांना घेणार का? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार म्हणाले, “अजित पवार गटात घालमेल सुरु असेल की मला माहीत नाही. पण आता त्यांच्यासंबंधीची आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांनी हा निर्णय घेतल्या त्यांच्याविषयी आमच्या पक्षात फेरविचार होणार नाही. सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेणारे नेते आणि त्यांच्यासह गेलेल्या सगळ्यांना पक्षाचे दरवाजे बंदच असतील” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.(Sharad Pawar say Door Closed For Ajit Pawar and his MLA ) आमची ही भूमिका स्वच्छ आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Latest Posts

Don't Miss