Friday, January 17, 2025

Latest Posts

मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार

Sharad Pawar on Ram Mandir Inauguration : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत. जुन्नरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शेतकरी मेळावा संपन्न होत आहे. तसेच विघ्नहर साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचा विस्तारीकरण लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यानंतर शरद पवार  (Slams Central Govt) यांनी शेतक-यांना संबोधित करताना शेतकरी धोरणावरुन केंद्र सरकारवर टीका केली.

“जगात साखर आणि इथेनॉलची गरज लक्षात घेऊन साखर आणि इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिले जाते. माजी केंद्रीय कृषीमंत्री म्हणून केंद्र सरकारमध्ये यापुर्वी केलं. केंद्रात गृहखातं नाकारुन कृषी खातं मागुन घेतलं. त्याकाळात शेतीसाठी खुप काही करता आलं,” असे शरद पवार यावेळी म्हणाले.

कांदा निर्यातबंदीवरुन सरकारला फटकारले…

“कांदा निर्यातबंदी धोरणात सातत्य पाहिजे. निर्यातबंदी कशासाठी केली. कांदा महाग झाला म्हणुन निर्यातबंदी घाला म्हणुन त्यावेळी मागणी केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव मिळावा हिच भावना आहे. साखर उत्पादन जास्त असतानाही साखरेची निर्यात करायची नाही हे धोरण योग्य नाही. साखर, कांदा निर्यात धोरणात सातत्य हवं..” असे ते म्हणाले.

घराणेशाहीवरुन मोदींवर टीका…

यावेळी बोलताना शरद पवार यांनी घराणेशाहीच्या टीकेवरुन पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.तसेच “डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं…” असेही शरद पवार म्हणाले.

राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाही..

“अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार.(No Invitation To Sharad Pawar on Ram Mandir inauguration) मात्र 22 जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत,” असे शरद पवार म्हणाले.तसेच “अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेला नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील..” असेही शरद पवार म्हणाले.

Latest Posts

Don't Miss